Showing posts with label Variety. Show all posts
Showing posts with label Variety. Show all posts

Friday, January 21, 2022

रूईचे फुलं

रूईचे फुल

 रुई ही एक विषारी आयुर्वेदिक  वनस्पती आहे. हे एक झुुडुप आहे.  रूईचे झाड हे सर्वत्र भारतात, नेपाळ, पाकिस्तानात आढळते. यात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या रंगाच्या फुलांची रूई व दुसरी    पांढ-या फुलांची रूई. जांभळ्या फुलांची रूई सर्वत्र आढळते.     पांढ-या फुलांची रूई क्वचितच सापडते.  यातील पांढ-या फुलांच्या रूईच्या झाडाला 'मंदार' असेही म्हणतात. हिंदुशास्रात रूईला खुप महत्व आहे.  १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्यया मंदार वॄक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे. तिची साल पिवळ पांढरी असुन  खोडावर साधी, समोरासमोर, जाड, लहान देठांचखोडांना वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असता त्यांच्या देठांतून पांढरा चीक बाहेर पडतो. फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि त्यांच्या पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांत पाच पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. या झाड बद्दल अशी ही मान्यता आहे की, तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्र-मंत्र पासून सर्व प्रकारच्या काळ्या जादू पासून जादू टोण्या पासून करणी पासून सुरक्षित राहील.

आपल्या प्रगती वरती जळणारे अनेक लोक असतात आणि मग जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावरती झाली तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर अशा या काळ्या जादू पासून हे झाड आपले संरक्षण करतो खरं तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ भटकू सुद्धा न देणारं असं हे झाड आहे आणि म्हणून आपल्या घरात सकारात्मक शक्ती जर वाढीस लावायचे असेल तर आपली प्रगती करायची असेल तर हे झाड आपण नक्की लावा

पांढऱ्या रुईला मंदार, आक, अर्क आणि अकौआ असे देखील म्हणतात.

Monday, January 10, 2022

वेगवेगळ्या राज्यात मकरसंक्रांतिचे नाव व माहिती

        

             मकरसंक्रांति  

  1. सुर्याचे धनु राशीतुन मकर राशी प्रवेश होतो. तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते.  हा एकच असा आहे कि, तो निच्छित तारखेला येतो. कारण हिंदु पंचांग हे चंद्रनुसार असतात. म्हणुन बाकी सर्व सण त्या तिथिनुसार येतात.
  2. हा एकच सण सुर्य तिथिवर साजरा केला जाते.
  3. सुर्यचे उत्तरायन हे २१-२२ डिसेंबरला सुरु होते . पण सुर्य मकर राशी प्रवेश १४-१५ जानेवारीला होते.                                                         
  4. हिंदू मान्यतेनुसार उत्तरायन हे शुभ मानले जाते.
  5. मकरसंक्रांत ही सण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावाने, पद्धतिने साजरा केला जातो.
  6. सुर्याचे मकर राशी प्रवेश होता तेव्हा वातावरण हि बदलते ,दिवस तिळतिळ मोठा होतो. ऱाञ छोटी होवु लागते.
  7. थंडी कमी व्हायला सुरवात होते. पण हवेत बर-यापैकी गारवा असतो. उत्तरकडील वारे वाहत असतात.
  8. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  9. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  10. मकरसंक्रात वेगवेगळ्या नावने, वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जातो.

  1.   तामिळनाडू:-   पोंगल 
  2. आंध्र प्रदेश :-    संक्रांती 
  3. केरळ.   :-        संक्रांती 
  4. कर्नाटक   :-     संक्रांती 
  5. महाराष्ट्र.   :-    मकरसंक्रांति
  6. मध्य पदेश :-   सक्रांट / संकृत
  7. बिहार :-          संक्रांट / संकृत
  8. छत्तीसगड:-    संक्रांट / संकृत 
  9. झारखंड  :-     संक्रांट / संकृत 
  10. सिक्कीम :-    संक्रांट / संकृत 
  11. गुजरात:-      उत्तरायण 
  12. राजस्थान :-  उत्तरायण 
  13. उत्तरप्रदेश :-   खिचडी 
  14. पश्चिम बिहार:-  खिचडी 
  15. पश्चिम बंगाल:- खिचडी 
  16. हरियाणा. :-     मगही 
  17. हिमाचल प्रदेश:- मगही 
  18. पंजाब:-           लोहरी 
  19. आसाम:-       माघ बिहू
  20. काश्मीर :-    शिशूरसंक्रात
  21. त्रिपुरा:-   पौष संक्रांती 
  22. मेघालय:- 
  23. ओडेसा 
  24. अरुणाचल प्रदेश 
  25. नागालँड. :- साजरी केली जात नाही 
  26. उत्तराखंड :-  खिचडी/ संकृत  
  27. गोवा :-  साजरी केली जात नाही 
  28. तेलंगणा:- संक्रांती 
  •  लोहडी-   पंजाब, हरियाणामध्ये लोहडी नावाने मकरसंक्रांत एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राञी शेकोटी पेटवुन अग्निची पुजा करतात.
  •  पारंपारिक लोकगीते म्हणुन नाचून साजरी करतात. खिचडीचा नैवेद्य करतात. प्रामुख्याने भुईमूगाच्या शेंगा, तिळ, गुळ, यांचा वापर केला जातो. 
  •   पोंगल-  तामिळनाडु मधील मोठा सण असतो. त्यानिमित्याने शेतकरी सुर्यची पुजा करतात. हा सण तीन दिवस असतो, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात, त्यादिवशी इंद्राची पुजा करतात व गोड जीवन करतात. दुस-या दिवशी घराच्या अंगणात खीर (तांदुळ व दुध) करतात, तीचा नैवेद्य सुर्य व गणपतीला दाखवितात. तिस-या दिवशी गोपुजन करतात. 
  • उत्तरायन -   मकरसंक्रांत गुजरातमध्ये उत्तरायन नावने साजरी केली जाते.गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडविले जातात. उत्तरकडील वारे पतंग उडविण्याची मजा आधिक वाढवितात. दिवसभर आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते.तळलेले पदार्थ, गुळ, तिळ, खिचड़ी नैवेद्य सुर्याला दाखवितात.
  • मकरसंक्रांत- महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस "भोगी".  या दिवशी भोगीची भाजी व बाजरी भाकरी केली जाते.भोगी भाजीत वांगे, वाल, गाजर, सोलाने, तिळ घालुन भाजी बनवितात. गोपुजन करतात, गगायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात. संक्रांतिच्या दिवशी तिळ पोळी करतात. तिळ  व गुळ एकञ करुन रे लहान व्यक्ति देतात . ञिक्रांतीला ५ वर्षाखाली लहान मुलांना बोर व रेवडी वापरुन बोरन्हान करतात
  • खिचडी- भारताच्या पूर्व भागात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा उत्सव खिचडी उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये बुडवून दिवसाची सुरूवात केली जाते. यावेळी अलाहाबाद माघ कुंभ सुरू होते. तीळ लाडू खाल्ले जातात व रात्रीच्या वेळी मिश्रित धान्यांची खिचडी बनविली जाते, जी देवाला अर्पित केल्यावर प्रसाद म्हणून घेतली जाते.
  • सक्रांट-  प्रदेशात सक्रात उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि सिक्कीममध्येही साजरा केला जातो. तीळ आणि गूळापासून बनवलेल्या मिठाई या सणाच्या गोडवा वाढवतात.
  • भोगाली बिहू/माघ बिहू-  भोगाली बिहू उत्सव भारताच्या ईशान्येकडील आसाममध्ये साजरा केला जातो. बिहू उत्सवात होलिका (लाकडाचा साठा) जाळला जातो. शेतकर्‍यांनी तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस पिके घेतल्यानंतर हा सणही साजरा केला जातो. 
  • कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.

      

Monday, June 22, 2020

जुईचे फुलं

                जुई फुल

  • अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. जुई हे एक वेलीय झाड आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जस्मिनम ऑरिक्युलेटम (Jasminum auriculatum) असे आहे.हिला इग्रंजीत Needle Flower Jasmine   म्हणतात.     कुळ-  ओलिएसी 
  • जुईला संस्कृतमध्ये गणिका, अम्बष्ठा , मुग्धी,  यूथिका, सुचिमल्लिका अशी नावे आहेत. हिला इंग्रजीत Needle Flower Jasmine म्हणतात हिं. जुही, जुई; क. कदरमळ्ळिगे; . 
  • ही झुडपासारखी वेल मूळची उष्ण कटिबंधातील असून ती भारताच्या द्वीपकल्पात दक्षिणेकडे केरळापर्यंत आढळते. 
  • बागेतूनही तिची लागवड करतात. 
  • पाने बहुधा साधी, समोरासमोर, परंतु अनेकदा त्रिदली असून बाजूची दले फार लहान अथवा कर्णिकाकृती (कानाच्या पाळीसारखी). बेलाच्या पानाप्रमाणे तीन पाने एकत्र असल्याने तिला बेल जुई ही म्हटले जाते. 
  • फुलोरा संयुक्त, अनेक फुले असलेली विरळ वल्लरी [पुष्पबंध] व तीवर लहान पांढरी सुगंधी फुले असतात.
  • पुष्पमुकुट-नलिका १·२ सेंमी. लांब असून प्रत्येक पाकळीचा सुटा भाग दीर्घवर्तुळाकृती व ०.६ सेंमी. लांब असतो. 
  • एकूण संदले पाच व पाकळ्या पाच ते आठ व फूल समईसारखे (अपछत्राकृती); केसरदले दोन, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे [फूल]
  • वनस्पतीची लागवड सुगंधी फुलांसाठी भारतात सर्वत्र (विशेषत: उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल करतात; उ. प्रदेशात गाझीपूर, जौनपूर, फरुखाबाद आणि कनौज येथे व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. 
  • हिला निचऱ्याची व मध्यम प्रकारची जमीन लागते; हिवाळी हंगामात जमीन नांगरून, कुळवून व खत घालून वाफे तयार करतात व त्यांत नोव्हेंबर-जानेवारीच्या दरम्यान वेलाचे तुकडे तीन मी. अंतरावर लावतात. मोठया झुडपांजवळ जमिनीपासून नविन रोपही उगवतात.
  • पावसाळ्यात (जुलै-ऑगस्टच्या सुमारास ) फुले येण्यास सुरुवात होते. वेल वाढू लागले म्हणजे मांडवांवर चढवितात.
  • फुले हलकी असल्याने ती एका किग्रॅ.मध्ये २६,००० पर्यंत मावतात.
  • हेक्टरी सु. ९०–१८५ किग्रॅ. फुले मिळतात. ह्या सुगंधी फुलांतून ०·२० ते ०·३०% अत्तर निघते व ते गर्द तांबडे असते. 
  • फुलांपासून सुगंधी  तेलही तयार करतात. अत्तराला आणि तेलाला ताज्या फुलांच्या सुगंधासारखाच वास येतो;
  • तो जॅस्मिनच्या इतर जातींतील फुलांपेक्षा अधिक आल्हाददायक असतो. 
  • वेलावर कधीकधी काळ्या बुरशीचा (मेलिओला जॅस्मिनीकोला ) रोग पडतो. त्यावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण फवारतात.
  • जुईच्या फुलांचे चूर्ण, गुलकंद बनविले जाते. त्याचा उपयोग आम्लपित्त व पोटाचा अल्सरवर गुणकारी आहे. जुईमध्ये शितल तत्व आहे. तीचा उपयोग नेत्ररोग, पित्तनाशक, दंतरोग म्हणुन ही केला जातो. 

 

Thursday, June 11, 2020

गोकर्ण फुलं

                      

                           गोकर्ण फुलं



     निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा      आकार आणि सुवास असणारी फुले                     आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले           लक्ष वेधून घेतो. असेच एक सुंदर, नाजूक   फूल म्हणजे गोकर्ण.

       गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय                  सदाहरित वनस्पती. Clitoria ternatea            (क्लायटोरिया टरनेशिया) हे गोकर्णाचे शास्त्रीय      नाव.

         फुलांचा आकार गायीच्या कानासारखा                   असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले          असावे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा            असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी,          सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील       आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या             पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.                     गोकर्णाच्या फुलांचा आकार गायीच्या                   कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी                      बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी              असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा          असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले        येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो. 

        फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा                    साधारण  फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या;            परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची            भाजी केली जाते.गोकर्णाच्या फुलांचे असंख्य           औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग,        व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला     जातो. 

     निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक                  रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले             सावलीत वाळवून त्याची पावडर करतात.           या  पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या          फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध           .किंवा गूळ घालून घेतात.

      गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते.          शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि        त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा                बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण             गोकर्णाची नवीन रोपे तयार करू शकतो.               पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत           या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत         करावी लागत नाही.घराची गॅलरी, कमान,            शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार..                अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची              लागवड करून तो परिसर सुशोभित करू                 शकता. गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल,           मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर          केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या               सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे.               तसेच त्वचा- विकार आणि                                     रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर        केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही        रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर            करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित         होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच           की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही               सुंदर नाव आहे.

Sunday, January 27, 2019

जाई फूल

         जाई फूल

    हिंदी नाव- जाई
  इंग्रजी नाव- Jasmine
  • जाई फुले सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे.
  • जाईचे फुल अगदी नाजुक असते.
  • या फुलाला पाच पाकळ्या असतात.
  • जाईची कळीला लाल गुलाबी पट्टा असतो.
  • जाईचा वेल असतो.
  • जाईचा वेल लावताना प्रथम गोल खड्डा करुन त्यात जाईच्या फांदीचे कडे करुन ,ते मातीत पुरले जाते.
  • काही दिवसानंतर त्यातुन कोंब येतात व वेल वाढु लागतात
  • जाईचे पाने संयुक्त पद्धतिचे असतात.
  • एका पर्णिकाला पाच छोटे पाने असतात.
  • याच्या फांद्या नाजुक असतात, त्यांना आधाराची गरज असते, त्यासाठी मांडव करावा लागतो.
  • हे फुल सुगंधी आहे. त्यापासुन सुगंधी द्रव्य बनवितात.
  • जाईच्या अगरबत्ती,अत्तराला बाजारात चांगली मागणी आहे.
  • केसांच्या वाढीसाठी जाईच्या फुलांपासुन तेल केले जाते.
  • जाई पाने दात दुखीवर उपाय म्हणुन वापरतात.
  • अलीकडे जाईच्या फुलांची वाढती मागणीमुळे याची लागवड व्यापारी पद्धतिने होत आहे
    जाई फुल,Jasmine flowers
    Jasmine flowers

    जाई फुल
    जाई फुलाची कळी



    जाई फुल
    जाईचे पाने

Thursday, January 17, 2019

झेंडु फुल

                            झेंडु फुल
                  
      हिंदी नाव : गेंदा
     इग्रजी : marigold

  •     या फुलांचे  रंग पिवळे ,लालसर-पिवळे, फिकट  पिवळे असतात. या झाडाची उंची फार वाढत नाही. ते रोप प्रकारात मोडते. त्याची पाने बारीक व लांबट आकाराची असतात. पानांचा रंग काळपट हिरवा असतो. झेंडुला उष्ण, कोरडे, व दमट हवमान लागते. झेंडुच्या फुलांत लहानलहान भरपूर पाकळ्या असतात. या झाडाला बी येत नाही.या पाकळ्या सुकल्या नंतर त्यापासुन रोप तयार करतात.
    झेंडु फूल, marigolds flower
    Marigolds flowers

    झेंडु फूल, marigolds flower
    झेंडु फूल

Friday, January 4, 2019

निशिगंध फुल

                             निशिगंध फुल


             हिंदी नाम - रजनीगंधा

       .  इग्रजी नाव - tube-rose

    निशिगंधालाच गुलछडी, असेही म्हणतात.   निशिगंधनिशिगंध हि वनस्पती १.५ ते २ मी.उचीची असते. त्याचे खोड हे कंद स्वरुपात जमिनी खाली असते.नविन रोप हे  कंदापासुनच होते.निशिगंधाची पाने लांब गवतासारखी असतात.या झाडाला फांद्या नसतात.कंदातुन एक सरळ दांडी येते व त्याला वरती कळ्या लागतात.निशिगंधाच्या फुलांच्या  देठे वाकडी असतात.या फुुलाच्या पाकळ्या छोट्या जाड असतात.या फुलांना छान सुगंध असतो.हि फुले सायंकाळी उमलु लागतात व राञीपर्यत उमलतात म्हणुन त्याला 'निशिगंध'म्हणतात. निशिगंधाच्या  तीन प्रकार पडतात.पांढरा निशिगंध, तांबडा निशिगंध, व्हेरीगेटेड निशिगंध असे प्रकार आहेत.पांढरा निशिगंधाची लागवड करताना जमिनीत कंद खोचतात. त्यातुन पाने व कोंब बाहेर येतो. काही दिवसानंतर त्यातुनच एक दांडा बाहेर येतो. तो दांडा १.५ ते २ फुट उंच झाला कि त्याच्या टोकाला कळ्याचा घोस लागतात.फुलांचा रंग पांढरा असतो.फुलांचा देठ वाकडा असतो.याला छान असतो.तांबडा निशिगंधाच्या फुलांच्या रंग तांबडा असतो. देठ सरळ असते. व्हेरीगेटेड निशिगंधचे 


Tube rose , nishigandha flower
निशिगंधा

Nishigandha, tuberose,
निशिगंधा

Thursday, January 3, 2019

मोगरा फुल

 

                              मोगरा फुल

                      हिंदी:- मोगरा

                      इग्रजी:- Jasmine


  •                   मोगरा हे सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे.  साधारण २ रे ३ से. मी. ञिज्या असलेले हे छोट फुल त्याच्या वासामुळे खुप आवडीचे आहे.
  •   मोगरा विविध प्रकारात असतो. त्यानुसार बट मोगरा, दुहेरी मोगरा, हजारी मोगरा व एकेरी मोगरा अशी मोग-याची नावे आहेत.
  • मोग-याची फुले सफेद रंगाची छोटी असतात.
  • त्याच्या पानांचा रंग गडद हिरवा, व आकाराने गोल असतात 
  • मोग-याला उन्हाळ्यात फले येतात. एकदा फुलांना सुरवात झाली की भरपूर फुले येतात.
  • बट मोग-याचे गेंदेदार छोटे असते. ते झुपक्याने येते. व वास खुप असतो. 
  • याच्या झाड झुपडाप्रमाने असते.
  • एकेरी मोग-याच्या फुलाला पाकळ्या एकेरी असतात. तो वेलाप्रमाने वाढतो.
  • याला वेली मोगरा हि म्हणतात.
  • केरी मोग-याला वास खुप असतो .
  • दुहेरी मोगर-याला दुहेरी पाकळ्या असतात.फुल थोडे मोठे असते. 
  •  हे झाड जमीनीवर किंवा कुंडीत हि वाढते
  • हजारी मोगरा तसा खुप वेगळा वाटतो.
  • त्याची पाने मोठी असतात. फुले गुच्छात, मोठी , कडेने तांबुस रंगाची व मधी सफेद रंगाची असतात.
  • वास कमी असतो.
  • सुगंधामुळे मोग-याचा उपयोग अत्तर, सुगंधी तेल, साबुन, अगरबत्ती, बनविण्यासाठी केला जातो.
  • तसेच या फुलांचे हार, गजरे करतात. देवपुजेत हि या फुलाला स्थान आहे.
  • Mogra f, Mogra flower
    Mogra
  • मोग-याचा उपयोग त्वाचेच्या आजारांवर हि करतात़.
  • Mogra ,Mogra flowers
    Mogra

    Mogra fl, Mogra flowers
    Mogra

    Mogra flow, Mogra flowers
    Add captionMograमोगरा

Tuesday, January 1, 2019

गुलाब फुल

                       

                              गुलाब फुल
                            
                  हिंदी:-    गुलाब फूल
                 इग्रंजी:-   Rose
      
                गलाब एक सुंदर , सुगंध असणारे फुल आहे.
 गुलाबाचे फुल विविध रंगाचे व आकारांचे आहे.
 गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाबाचे झाड ३ते५ फुट उंचीचे काटेरी असते. गुलाबासाठी मध्यम तापमान लागते .
मोकळी हवा व सुर्यप्रकाशात त्याला बारामहिने फुले येतात.
  • गुलाब विविध आकारात व रंगात आहेत.
  • गुलाबाच्या फुलांचा उपयोग फुलांचे सजावटीत, लग्न समारंभ केला जातो.त्यासाठी मोठे व कमी वास असलेले फुल वापरतात.
  • सुगंधी गुलाबापासुन अत्तर, गुलाबजल, गुलकंद तयार केला जातो
  • .गुलाबाला देवपुजेत ही महत्वपूर्ण स्थान आहे
  • .गुलाबाच्या सुदंरतेमुळे त्याची मनात हि जागा वेगळीच आहे. विविधप्रकारच्या केशरचने स्ञिया त्याचा वापर करतात.
  •  तसेच १२ फेब्रवारी गुलाब दिवस म्हणुन साजरा केला जातो. लाल रंगाचा गुलाब प्रेमाचा तर पिवळा गुलाब मैञीचा प्रतिक मानला जातो.
  • सुगंधी गुलाबपासुन गुलकंद तयार करताना प्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करुन स्वच्छ बरणी भरावे, व वरुन साखर पेरतात.
  • बरणीच झाकन पक्क लावुन , ती बरणी १० ते १५ दिवस उन्हात ठेवतात.
  • गुलकंद थंड तत्वाचा असल्यामुळे उन्हाळ्यात खाने उत्तम मानले जाते.
  • गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळुन गुलाबजल तयार करतात. त्याचा उपयोग सौर्दया प्रसादनात पुर्वीपासुन होत आला आहे.
  • गुलाब त्याच्या सौर्दय व उपयोगामुळे फुलांचा राजा बनला आहे.
    Rose information , flowers information in Marathi
    Rose flower

    Rose information , flowers information in Marathi
    Rose flowers

    Rose information , flowers information in Marathi
    Rose flowers

Monday, December 31, 2018

जास्वंदी फुल

             जास्वंदी फुल

            हिंदी:- गुडहल
          इंग्रजी:- Hibiscus. 




       
जास्वंदी फूल विविध रंगाचे असतात. ते लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे व इतर विविध रंगाचे असतात. जास्वंदीचे झाड सुमारे १५ ते १६ फुट उंचीचे असते.ते उष्ण हवामानात वाढते. जास्वांदीला वर्षभर फुले येतात.जास्वांदीच्या फुलाला पाच पाकळ्या असतात.तर काही फुलांना दुप्पट ही पाकळ्या असतात.या फुलांचे औषधी उपयोग ही केला जातो, केस गुणा, पांडे केस होणे,ब्लड प्रेशर, किडनीसारख्या आजारांवर याचा उपयोग केला जातो.

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...