Monday, June 22, 2020

जुईचे फुलं

                जुई फुल

  • अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. जुई हे एक वेलीय झाड आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जस्मिनम ऑरिक्युलेटम (Jasminum auriculatum) असे आहे.हिला इग्रंजीत Needle Flower Jasmine   म्हणतात.     कुळ-  ओलिएसी 
  • जुईला संस्कृतमध्ये गणिका, अम्बष्ठा , मुग्धी,  यूथिका, सुचिमल्लिका अशी नावे आहेत. हिला इंग्रजीत Needle Flower Jasmine म्हणतात हिं. जुही, जुई; क. कदरमळ्ळिगे; . 
  • ही झुडपासारखी वेल मूळची उष्ण कटिबंधातील असून ती भारताच्या द्वीपकल्पात दक्षिणेकडे केरळापर्यंत आढळते. 
  • बागेतूनही तिची लागवड करतात. 
  • पाने बहुधा साधी, समोरासमोर, परंतु अनेकदा त्रिदली असून बाजूची दले फार लहान अथवा कर्णिकाकृती (कानाच्या पाळीसारखी). बेलाच्या पानाप्रमाणे तीन पाने एकत्र असल्याने तिला बेल जुई ही म्हटले जाते. 
  • फुलोरा संयुक्त, अनेक फुले असलेली विरळ वल्लरी [पुष्पबंध] व तीवर लहान पांढरी सुगंधी फुले असतात.
  • पुष्पमुकुट-नलिका १·२ सेंमी. लांब असून प्रत्येक पाकळीचा सुटा भाग दीर्घवर्तुळाकृती व ०.६ सेंमी. लांब असतो. 
  • एकूण संदले पाच व पाकळ्या पाच ते आठ व फूल समईसारखे (अपछत्राकृती); केसरदले दोन, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे [फूल]
  • वनस्पतीची लागवड सुगंधी फुलांसाठी भारतात सर्वत्र (विशेषत: उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल करतात; उ. प्रदेशात गाझीपूर, जौनपूर, फरुखाबाद आणि कनौज येथे व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. 
  • हिला निचऱ्याची व मध्यम प्रकारची जमीन लागते; हिवाळी हंगामात जमीन नांगरून, कुळवून व खत घालून वाफे तयार करतात व त्यांत नोव्हेंबर-जानेवारीच्या दरम्यान वेलाचे तुकडे तीन मी. अंतरावर लावतात. मोठया झुडपांजवळ जमिनीपासून नविन रोपही उगवतात.
  • पावसाळ्यात (जुलै-ऑगस्टच्या सुमारास ) फुले येण्यास सुरुवात होते. वेल वाढू लागले म्हणजे मांडवांवर चढवितात.
  • फुले हलकी असल्याने ती एका किग्रॅ.मध्ये २६,००० पर्यंत मावतात.
  • हेक्टरी सु. ९०–१८५ किग्रॅ. फुले मिळतात. ह्या सुगंधी फुलांतून ०·२० ते ०·३०% अत्तर निघते व ते गर्द तांबडे असते. 
  • फुलांपासून सुगंधी  तेलही तयार करतात. अत्तराला आणि तेलाला ताज्या फुलांच्या सुगंधासारखाच वास येतो;
  • तो जॅस्मिनच्या इतर जातींतील फुलांपेक्षा अधिक आल्हाददायक असतो. 
  • वेलावर कधीकधी काळ्या बुरशीचा (मेलिओला जॅस्मिनीकोला ) रोग पडतो. त्यावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण फवारतात.
  • जुईच्या फुलांचे चूर्ण, गुलकंद बनविले जाते. त्याचा उपयोग आम्लपित्त व पोटाचा अल्सरवर गुणकारी आहे. जुईमध्ये शितल तत्व आहे. तीचा उपयोग नेत्ररोग, पित्तनाशक, दंतरोग म्हणुन ही केला जातो. 

 

No comments:

Post a Comment

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...