Monday, January 10, 2022

वेगवेगळ्या राज्यात मकरसंक्रांतिचे नाव व माहिती

        

             मकरसंक्रांति  

  1. सुर्याचे धनु राशीतुन मकर राशी प्रवेश होतो. तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते.  हा एकच असा आहे कि, तो निच्छित तारखेला येतो. कारण हिंदु पंचांग हे चंद्रनुसार असतात. म्हणुन बाकी सर्व सण त्या तिथिनुसार येतात.
  2. हा एकच सण सुर्य तिथिवर साजरा केला जाते.
  3. सुर्यचे उत्तरायन हे २१-२२ डिसेंबरला सुरु होते . पण सुर्य मकर राशी प्रवेश १४-१५ जानेवारीला होते.                                                         
  4. हिंदू मान्यतेनुसार उत्तरायन हे शुभ मानले जाते.
  5. मकरसंक्रांत ही सण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावाने, पद्धतिने साजरा केला जातो.
  6. सुर्याचे मकर राशी प्रवेश होता तेव्हा वातावरण हि बदलते ,दिवस तिळतिळ मोठा होतो. ऱाञ छोटी होवु लागते.
  7. थंडी कमी व्हायला सुरवात होते. पण हवेत बर-यापैकी गारवा असतो. उत्तरकडील वारे वाहत असतात.
  8. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  9. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  10. मकरसंक्रात वेगवेगळ्या नावने, वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जातो.

  1.   तामिळनाडू:-   पोंगल 
  2. आंध्र प्रदेश :-    संक्रांती 
  3. केरळ.   :-        संक्रांती 
  4. कर्नाटक   :-     संक्रांती 
  5. महाराष्ट्र.   :-    मकरसंक्रांति
  6. मध्य पदेश :-   सक्रांट / संकृत
  7. बिहार :-          संक्रांट / संकृत
  8. छत्तीसगड:-    संक्रांट / संकृत 
  9. झारखंड  :-     संक्रांट / संकृत 
  10. सिक्कीम :-    संक्रांट / संकृत 
  11. गुजरात:-      उत्तरायण 
  12. राजस्थान :-  उत्तरायण 
  13. उत्तरप्रदेश :-   खिचडी 
  14. पश्चिम बिहार:-  खिचडी 
  15. पश्चिम बंगाल:- खिचडी 
  16. हरियाणा. :-     मगही 
  17. हिमाचल प्रदेश:- मगही 
  18. पंजाब:-           लोहरी 
  19. आसाम:-       माघ बिहू
  20. काश्मीर :-    शिशूरसंक्रात
  21. त्रिपुरा:-   पौष संक्रांती 
  22. मेघालय:- 
  23. ओडेसा 
  24. अरुणाचल प्रदेश 
  25. नागालँड. :- साजरी केली जात नाही 
  26. उत्तराखंड :-  खिचडी/ संकृत  
  27. गोवा :-  साजरी केली जात नाही 
  28. तेलंगणा:- संक्रांती 
  •  लोहडी-   पंजाब, हरियाणामध्ये लोहडी नावाने मकरसंक्रांत एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राञी शेकोटी पेटवुन अग्निची पुजा करतात.
  •  पारंपारिक लोकगीते म्हणुन नाचून साजरी करतात. खिचडीचा नैवेद्य करतात. प्रामुख्याने भुईमूगाच्या शेंगा, तिळ, गुळ, यांचा वापर केला जातो. 
  •   पोंगल-  तामिळनाडु मधील मोठा सण असतो. त्यानिमित्याने शेतकरी सुर्यची पुजा करतात. हा सण तीन दिवस असतो, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात, त्यादिवशी इंद्राची पुजा करतात व गोड जीवन करतात. दुस-या दिवशी घराच्या अंगणात खीर (तांदुळ व दुध) करतात, तीचा नैवेद्य सुर्य व गणपतीला दाखवितात. तिस-या दिवशी गोपुजन करतात. 
  • उत्तरायन -   मकरसंक्रांत गुजरातमध्ये उत्तरायन नावने साजरी केली जाते.गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडविले जातात. उत्तरकडील वारे पतंग उडविण्याची मजा आधिक वाढवितात. दिवसभर आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते.तळलेले पदार्थ, गुळ, तिळ, खिचड़ी नैवेद्य सुर्याला दाखवितात.
  • मकरसंक्रांत- महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस "भोगी".  या दिवशी भोगीची भाजी व बाजरी भाकरी केली जाते.भोगी भाजीत वांगे, वाल, गाजर, सोलाने, तिळ घालुन भाजी बनवितात. गोपुजन करतात, गगायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात. संक्रांतिच्या दिवशी तिळ पोळी करतात. तिळ  व गुळ एकञ करुन रे लहान व्यक्ति देतात . ञिक्रांतीला ५ वर्षाखाली लहान मुलांना बोर व रेवडी वापरुन बोरन्हान करतात
  • खिचडी- भारताच्या पूर्व भागात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा उत्सव खिचडी उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये बुडवून दिवसाची सुरूवात केली जाते. यावेळी अलाहाबाद माघ कुंभ सुरू होते. तीळ लाडू खाल्ले जातात व रात्रीच्या वेळी मिश्रित धान्यांची खिचडी बनविली जाते, जी देवाला अर्पित केल्यावर प्रसाद म्हणून घेतली जाते.
  • सक्रांट-  प्रदेशात सक्रात उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि सिक्कीममध्येही साजरा केला जातो. तीळ आणि गूळापासून बनवलेल्या मिठाई या सणाच्या गोडवा वाढवतात.
  • भोगाली बिहू/माघ बिहू-  भोगाली बिहू उत्सव भारताच्या ईशान्येकडील आसाममध्ये साजरा केला जातो. बिहू उत्सवात होलिका (लाकडाचा साठा) जाळला जातो. शेतकर्‍यांनी तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस पिके घेतल्यानंतर हा सणही साजरा केला जातो. 
  • कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.

      

No comments:

Post a Comment

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...