Hello guys my blog is about : Basic information about flowers , festivals and diets in Marathi, marathi poems
Showing posts with label Festival. Show all posts
Showing posts with label Festival. Show all posts
Monday, January 10, 2022
वेगवेगळ्या राज्यात मकरसंक्रांतिचे नाव व माहिती
Thursday, June 4, 2020
वटपौर्णिमा
वट पौर्णिमा
हिंदु पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणुन साजरी केली जाते. ह्या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे वत्र करतात.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.
एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात
पुजा साहित्य:--
हळद-कुंकू, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध-अक्षता, फुले, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, सुपार्या, आंबा फळ, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम,
सौभाग्यवायनाचे साहित्य-
तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या , सुटे पैसे..इ.
पुजेचं ताट |
पुजा विधी:---
कुठल्याही वत्राच्या विधीला सुरवात करण्याआधी घरातील जेष्ठांचे आशिर्वाद घेऊन पुजेला सुरुवात करावी. या दिवशी सौभाग्यवतीने स्त्रीने नवे वस्त्र परिधान करावे, सौभाग्याचे लेने घालावे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. नंतर घरातील देवांची पूजा करून देवापुढे संकल्प करावा. सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. नंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जावे. प्रथम वडाच्या झाडाला
पाणी फिरवावे. पुर्व दिशेला तोंड करून बसावे. विड्याच्या पानांवर गणपती बाप्पाचे प्रतिक म्हणून सुपारी मांडावीत.गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजानंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
Monday, December 16, 2019
चंपाषष्टी व भरीत रोडगा नैवद्य
चंपाषष्टी व भरीत रोडगा नैवद्य
जेजुरीचा खंडोबा व तुळजापूरची जगदंबा ही महाराष्टातील जन मानसातील मानाची ठिकाणे आहेत.लोकांचे कार्य ह्या दोन दैवतांच्या पुजनाने व दर्शना शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, अशी श्राद्धा आहे. श्री शंकराने मणि व मल्ल दैत्यांचा वध करण्यासाठी श्री मार्तंड भैरव खंडोबा देवाचा कृतयुगा अवतार धारण केला
जेजुरीचा खंडोबा व तुळजापूरची जगदंबा ही महाराष्टातील जन मानसातील मानाची ठिकाणे आहेत.लोकांचे कार्य ह्या दोन दैवतांच्या पुजनाने व दर्शना शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, अशी श्राद्धा आहे. श्री शंकराने मणि व मल्ल दैत्यांचा वध करण्यासाठी श्री मार्तंड भैरव खंडोबा देवाचा कृतयुगा अवतार धारण केला
मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्टी या सहा दिवस श्री खंडोबा देवाचे घट बसवितात .त्यास खंडोबाचे षडरात्र उत्सव म्हणतात. घट बसल्यावर मल्हारी महात्म मार्तंड विजय, मल्हारी सहस्रनाम अशा ग्रंथांचे देवा पुढे वाचन करतात.रोज घटाला फुलांची माळ घालतात. जेजुरीत हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. चंपाषष्टी या दिवशी मार्तंड भैरवांने मल्लसुरांचा वध केला तेव्हा देवांनी व गणांनी देवाची पुजा चाफ्याच्या फुलांनी केली यामुळे षष्टीच्या या दिवसाला चंपाषष्टी असे म्हणतात. चंपाषष्टीच्या दिवशी मोठी याञा भरते. या दिवशी भरीत रोडगा, पुरण पोळी यांचा नैवद्य करतात.
Wednesday, November 27, 2019
मार्गशीर्ष महिना व त्यातील महालक्ष्मी व्रत
- मार्गशीर्ष महीना व त्यातील लक्ष्मी व्रत
- मराठी महीन्यातील नऊ नंबर येणारा महीना मार्गशीर्ष . हा महीना भगवान विष्णु लक्ष्मी समर्पित आहे.
- ह्या महीन्यात तसेतर विशेष सन नाहीत, पण उत्पन्ना एकादशी, मार्गशीर्ष अमावस्या, विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, दत्त जंयती अशा प्रमुख तिथि येतात.
- त्यातच मार्गशीर्ष महीन्यात येणारे सर्व गुरूवार महालक्ष्मीचे व्रत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने घरातील मुली व सुहासनी करतात.
- हे व्रत का करतात -------
- श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला सदैव लाभावी. आपला संसार सुखसमाधाने चालावा. सुख , शांति , ऐश्वर्य मिळविण्यासाठी हे व्रत करतात.
- हे व्रत करण्याची विधी ----
- व्रताची सुरूवात मार्गशीर्ष माहीन्यातील पहिल्या गुरूवार सुरू क रावी. व शेवटच्या गुरूवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष महीन्यातील शेवटच्या गुरूवार नाही जमले, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरूवारपासून व्रत सुरू करावे.
- पुजेची मांडणी--------
- घरातील पुजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे पिवळ्या रंगाचे कापड टाकावे. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मीचा फोटो जो आपल्या घरीतील रोज च्या पुजेचा तो मांडावा. फोटोसमोर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशावर कुंकवाच्या गंधाने स्वास्तीक काढावे, पाच कुंकवाचे व चार हळदीचे बोट उमठावे. कलशात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कलशावर विड्याची पाच पाने ठेवुन नारळ ठेवावे.घटाच्या उजव्या बाजुला दोन विड्याची पाने एकावर ठेवुन त्यावर एक सुपारी गणपतिचे प्रतीक म्हनुन मांडावे , समोर पीड़ा, खारीक, खोबर, बदाम, गुळ , लंवग, हिरवी विलायची, ठेवावी नैवद्याला पिवळ्या रंगाची फळे ठेवावी. पुजा मांडुन झाल्यावर पिवळ्या रंगाची फुले वाहावीत.आरती करावी, सर्वाना प्रसाद द्यावा. सायंकाळी कथा वाचावी. रात्रि श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवद्य दाखवावा. दिवसभर धरलेला उपवास रात्रि सोडावा.शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी-कुंक वाहुन नमस्कार करावा
- उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पुजा, आरती कहाणी- वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी-कुंकू देऊन एकेक फळ आणि या व्रतकथेची एकेक प्रत द्यावी. शक्य असल्यास एक सुवासिनीला जेवु घालावे.
व्रतकथेची पुस्तिका
व्रतकथेची पुस्तिका |
- ह्या व्रताच्या कथेत लक्ष्मी मातेचा हा संदेश दिला गेला आहे की,
- उतु नाही, मातु नाही , दिला शब्द तोडु नाही
- श्रीमतीवर गर्व करु नये, दैवी कृपा कशी फिरेन सांगता येत नाही, नेहमी आपल्यात नम्रता , बोलण्यात प्रेमळपणा राहु देवा.
Thursday, November 14, 2019
नवरात्रि/घटस्थापना
नवरात्रि/ घटस्थापना
- अश्विनी महीन्या सुरु होणा-या या नवरात्रिला शारदीय नवरात्रिही म्हणतात.
- नवरात्रित विशेष करून देवीची उपासना केली जाते
- .अश्विनी शुध्द प्रतिपदा ते नवमी, असा हा नऊ दिवसाच्या कालावधीत घरोघरी घट स्थापना केली जाते.
- घटामध्ये देवीची स्थापना करुन, नंदादीप प्रज्वलित करुन अदिमायेची नऊ दिवस मनोभावे पुजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
- या दिवशी देवघरातील सर्व देव मूर्ति व टाक हे साबण लिंबु लावुन स्वच्छ करतात . देवघर स्वच्छ धुवून काढतात. काही ठिकाणी देवघराला गेरू व चुऩ्याने रंगवतात
- त्यानंतर देवीचा टाक सोडुन सर्व देव देवघरात नेहमी प्रमाणे ठेवतात.
- एका स्वतंत्र पाट किंवा चौरंगावर देवीचा फोटो मांडतात. देवी टाक विड्याच्या पानावर ठेवुन फोटो समोर किंवा थोड एका बाजु मांडवा.
- आत घटाची तयारी करावी . परंपरेनुसार देवाच ताट, पत्रवाळी , मातीच भांड, किंवा काड्याची टोपली जात घट बसवितात ते भांड देवीच्या टाका समोर ठेवावे.
- त्यात सुकलेली काळी माती/ शेतातील माती भरावी.
- त्यात सप्तधान्याच्या बिया, म्हणजे गहु, तिळ जवस, करडई, हरभरा,धने,साळ उगविण्यासाठी टाकाव्यात.
- मधोमध घट मांडावा, त्यात पाच विड्याचे पाच विड्याचे पान ठेवावे.परंपरेनुसार वर नारळ ठेवावे.
- मला फार माहीत नाही पण माझ्या सासरी घटावर नारळ ठेवत नाही, असे मला माझ्या सासूबाईनी सांगितले. माहेरी आई घटावर नारळ ठेवते.
- हिंदु मान्यता नुसार कुठली पुजा गणपति शिवाय पूर्ण होवु शकत नाही, म्हणुन विड्याच्या पानवर प्रतिकांत्मक सुपारी मांडुन त्यापुढे विडा/ खारीक, खोबर, कन्या बदाम, विलायची, लवंग, गुळ ठेवावे.
- घटाच्या उजव्या बाजुला अखंड नंदादिप, जो नऊ दिवस विजणार नाही, प्रज्वलित करावा.
- पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घटावर सोडावी.
- संकल्प सोडावा, व गणपती, देवी, व नवरात्रीची आरती करावी.
- नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठन करतात, रोज वेगवेगळ्या पानाची माळ घटात सोडतात.
- नवमीला शेवंती, दशमीला झेंडु च्या फुलांची माळ घटवर सोडावी.
घटस्थापना
दशमीला घटातील धन
- अश्विनी महीन्या सुरु होणा-या या नवरात्रिला शारदीय नवरात्रिही म्हणतात.
- नवरात्रित विशेष करून देवीची उपासना केली जाते
- .अश्विनी शुध्द प्रतिपदा ते नवमी, असा हा नऊ दिवसाच्या कालावधीत घरोघरी घट स्थापना केली जाते.
- घटामध्ये देवीची स्थापना करुन, नंदादीप प्रज्वलित करुन अदिमायेची नऊ दिवस मनोभावे पुजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
- या दिवशी देवघरातील सर्व देव मूर्ति व टाक हे साबण लिंबु लावुन स्वच्छ करतात . देवघर स्वच्छ धुवून काढतात. काही ठिकाणी देवघराला गेरू व चुऩ्याने रंगवतात
- त्यानंतर देवीचा टाक सोडुन सर्व देव देवघरात नेहमी प्रमाणे ठेवतात.
- एका स्वतंत्र पाट किंवा चौरंगावर देवीचा फोटो मांडतात. देवी टाक विड्याच्या पानावर ठेवुन फोटो समोर किंवा थोड एका बाजु मांडवा.
- आत घटाची तयारी करावी . परंपरेनुसार देवाच ताट, पत्रवाळी , मातीच भांड, किंवा काड्याची टोपली जात घट बसवितात ते भांड देवीच्या टाका समोर ठेवावे.
- त्यात सुकलेली काळी माती/ शेतातील माती भरावी.
- त्यात सप्तधान्याच्या बिया, म्हणजे गहु, तिळ जवस, करडई, हरभरा,धने,साळ उगविण्यासाठी टाकाव्यात.
- मधोमध घट मांडावा, त्यात पाच विड्याचे पाच विड्याचे पान ठेवावे.परंपरेनुसार वर नारळ ठेवावे.
- मला फार माहीत नाही पण माझ्या सासरी घटावर नारळ ठेवत नाही, असे मला माझ्या सासूबाईनी सांगितले. माहेरी आई घटावर नारळ ठेवते.
- हिंदु मान्यता नुसार कुठली पुजा गणपति शिवाय पूर्ण होवु शकत नाही, म्हणुन विड्याच्या पानवर प्रतिकांत्मक सुपारी मांडुन त्यापुढे विडा/ खारीक, खोबर, कन्या बदाम, विलायची, लवंग, गुळ ठेवावे.
घटस्थापना |
दशमीला घटातील धन |
Tuesday, January 8, 2019
मकरसंक्रांती
मकरसंक्रांती
- महाराष्ट्रात मकरसंक्रांती १४ किंवा १५ जानेवारीला म्हणजे सुर्य धुन राशितुन मकर राशि प्रवेश करतो,त्या दिवशी साजरी केली जाते.
- महाराष्ट्रात मकरसंक्रात हा तीन दिवसाचा सण आहे .
- पहिला दिवस "भोगी"- मकरसंक्रात हा सण हिवाळ्याच येतो, वातावरणात ब-यापैकी गारवा असतो. वातावरण पिकास पुरक असते. अशा वातावरणात सर्वञ मुबलक भाजीपाल उपलब्ध असतो .याच्यामुळेच कदाचित सर्वञ भोगीची भाजी उपलब्ध अनेक भाज्या एकञ करुन बनवितात .आमच्या घरात भोगीची भाजी माझी आई बनवायची. त्यात ती -
- 1. वांगे. २. वालाच्या हिरव्या शेंगा ३ गाजर. ४. डिंग-या . ५. बोर. ६ सोलाने ( हिरवा हरभरा). ७.ओले शेंगादाने निवडुन, सोलुन स्वच्छ करायची. व महाराष्ट्रायिन पद्धतिने कांदा, लसुन , खोबर, कोथिंबिर, व मकरसंक्रातील मुख्य पदार्थ "तिळ" घालुन काळी भाजी करत. त्याबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी .
- भोगीला गायीची पुजा करतात व गायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात.
- दुसरा दिवस मकरसंक्रांतीचा- या दिवशी सकाळी तीळ, हळद, दाळीच पीठ ,उटन, एकञ करुन पेस्ट बनवितात, ते लावुन स्नान करतात . नंतर सुवासिनी "सुगडे" पुजतात.
Makara sankranti
-
Sugde
- ञिक्रांती- या दिवशी ५ वर्षाखाली लहान मुलांना काळा ड्रेस घालतात, आसपासचे लहान मुलांना बोलतात. ५ सुवासिनी बाळाला औक्षन करतात, नंतर बोर व रेवड्या एकञ करुन ते हळुवारपणे बाळाच्या डोक्यावरुन टाकतात.याला" बोरन्हानबोरन्हान "म्हणतात. पुढे येणा-या उन्हान्याचा ञास कमी व्हावा,म्हणुन बाळच "बोरन्हान" करतात.सुगडे- खापराचे छोटी ५ बोळकी घेतात, त्यात ऊसाचे तुकडे, बिब्याचे फुल, गाजराचे तुकडे, हिरवा हरभरा, भुइमुगाच्या शेंगा, व तीळगुळ भरतात. ते देवघराजवळ मांडतात. नंतर त्यातील दोन सुगडे घेवुन सुवासिनी मंदिरात जातात. सुवासिनी या वेळेस पारंपरिक वेशभूषा करतात.मंदिरात त्या देवाला सुगडे वाहतात, पतीच्या दिर्घआयुची प्रार्थना करतात , इतर सुवासिनीनां हळदकुंकु लावुल छोटी भेटवस्तु देतात. तिळ गुळ वाटुन" तिळगुळ घ्या, गोड बोला."असे बोलण्याची पद्धति आहे.या दिवशी घरी पुरण पोळीचा स्वयंपाक करतात. संध्याकाळी छोटे मोठ्याकडे जावुन तिळगुळ घेतात. व आर्शिवाद घेतात.
Makara sankranti
Sugde
Monday, January 7, 2019
मकरसंक्रांती
मकरसंक्राती
- भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मकरसंक्रांती साजरी केली जाते.
- लोहडी- पंजाब, हरियाणामध्ये लोहडी नावाने मकरसंक्रांत एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राञी शेकोटी पेटवुन अग्निची पुजा करतात. व
Lohri
- पारंपरिक लोकगीत म्हणत नाचुन साजरी करतात . खिचड़ीचा नैवैद्य करतात. त्यात प्रामुख्याने भुइमुगाच्या शेंगा, तिळ, गुळ, यांचा वापर करतात.
- पोंगल- तामिळनाडु मधील मोठा सण
Pongal
असतो. त्यानिमित्याने शेतकरी सुर्यची पुजा करतात. हा सण तीन दिवस असतो, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात, त्यादिवशी इंद्राची पुजा करतात व गोड जीवन करतात. दुस-या दिवशी घराच्या अंगणात खीर (तांदुळ व दुध) करतात, तीचा नैवेद्य सुर्य व गणपतीला दाखवितात. तिस-या दिवशी गोपुजन करतात.
- उत्तरायन - मकरसंक्रांत गुजरातमध्ये उत्तरायन नावने साजरी केली जाते.गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडविले जातात. उत्तरकडील वारे पतंग उडविण्याची मजा आधिकच वाढवितात.
Makar sankranti
- दिवसभर आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते.तळलेले पदार्थ, गुळ, तिळ, खिचड़ी नैवेद्य सुर्याला दाखवितात.
- मकरसंक्रांत- महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस "भोगी". या दिवशी भोगीची भाजी व बाजरी भाकरी केली जाते.भोगी भाजीत वांगे, वाल, गाजर, सोलाने, तिळ घालुन भाजी बनवितात. गोपुजन करतात, गगायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात. संक्रांतिच्या दिवशी तिळ पोळी करतात. तिळ व गुळ एकञ करुन रे लहान व्यक्ति देतात . ञिक्रांतीला ५ वर्षाखाली लहान मुलांना बोर व रेवडी वापरुन बोरन्हान करतात.
Makar sankranti
- कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.
Lohri |
Pongal |
Makar sankranti |
Makar sankranti |
- कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.
Sunday, January 6, 2019
मकरसंक्रांती
मकरसंक्रांती
मकरसंक्राती हा सुर्याशी संबंधीत एक सण आहे .
Pongal |
Makar sankranti |
- सुर्याचे धनु राशीतुन मकर राशी प्रवेश होतो. तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते.
- हा एकच असा आहे कि, तो निच्छित तारखेला येतो. कारण हिंदु पंचांग हे चंद्रनुसार असतात. म्हणुन बाकी सर्व सण त्या तिथिनुसार येतात.
- हा एकच सण सुर्य तिथिवर साजरा केला जाते.
- सुर्यचे उत्तरायन हे २१-२२ डिसेंबरला सुरु होते . पण सुर्य मकर राशी प्रवेश १४-१५ जानेवारीला होते.
- हिंदू मान्यतेनुसार उत्तरायन हे शुभ मानले जाते.
- मकरसंक्रांत ही सण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावाने, पद्धतिने साजरा केला जातो.
- सुर्याचे मकर राशी प्रवेश होता तेव्हा वातावरण हि बदलते ,दिवस तिळतिळ मोठा होतो. ऱाञ छोटी होवु लागते.
- थंडी कमी व्हायला सुरवात होते. पण हवेत बर-यापैकी गारवा असतो. उत्तरकडील वारे वाहत असतात.
- वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
- मकरसंक्रात वेगवेगळ्या नावने, वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जातो.
- मकरसंक्रांताची नाव- तमिलनाडु- "पोंगल",बिहार, झारखंड- "संक्रांत", पंजाब,हरियाणा- "लोहरी", गुजरात- "उत्तरायन"असे इतर ठिकानी ही मकरसंक्रांत सादरी केली जाते
Subscribe to:
Posts (Atom)
एकांत माझा
एकांत माझा हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा. नको...
-
विझलो जरी मी आज सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार र...
-
"सांगा कसं जगायचं"? "सांगा कसं जगायचं "? ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखनातून अवतरलेली एक सुंदर अशी क...
-
जाई फूल हिंदी नाव- जाई इंग्रजी नाव- Jasmine जाई फुले सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे. जाईचे फुल अगदी नाजुक असते. या फुला...