- मार्गशीर्ष महीना व त्यातील लक्ष्मी व्रत
- मराठी महीन्यातील नऊ नंबर येणारा महीना मार्गशीर्ष . हा महीना भगवान विष्णु लक्ष्मी समर्पित आहे.
- ह्या महीन्यात तसेतर विशेष सन नाहीत, पण उत्पन्ना एकादशी, मार्गशीर्ष अमावस्या, विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, दत्त जंयती अशा प्रमुख तिथि येतात.
- त्यातच मार्गशीर्ष महीन्यात येणारे सर्व गुरूवार महालक्ष्मीचे व्रत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने घरातील मुली व सुहासनी करतात.
- हे व्रत का करतात -------
- श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला सदैव लाभावी. आपला संसार सुखसमाधाने चालावा. सुख , शांति , ऐश्वर्य मिळविण्यासाठी हे व्रत करतात.
- हे व्रत करण्याची विधी ----
- व्रताची सुरूवात मार्गशीर्ष माहीन्यातील पहिल्या गुरूवार सुरू क रावी. व शेवटच्या गुरूवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष महीन्यातील शेवटच्या गुरूवार नाही जमले, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरूवारपासून व्रत सुरू करावे.
- पुजेची मांडणी--------
- घरातील पुजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे पिवळ्या रंगाचे कापड टाकावे. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मीचा फोटो जो आपल्या घरीतील रोज च्या पुजेचा तो मांडावा. फोटोसमोर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशावर कुंकवाच्या गंधाने स्वास्तीक काढावे, पाच कुंकवाचे व चार हळदीचे बोट उमठावे. कलशात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कलशावर विड्याची पाच पाने ठेवुन नारळ ठेवावे.घटाच्या उजव्या बाजुला दोन विड्याची पाने एकावर ठेवुन त्यावर एक सुपारी गणपतिचे प्रतीक म्हनुन मांडावे , समोर पीड़ा, खारीक, खोबर, बदाम, गुळ , लंवग, हिरवी विलायची, ठेवावी नैवद्याला पिवळ्या रंगाची फळे ठेवावी. पुजा मांडुन झाल्यावर पिवळ्या रंगाची फुले वाहावीत.आरती करावी, सर्वाना प्रसाद द्यावा. सायंकाळी कथा वाचावी. रात्रि श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवद्य दाखवावा. दिवसभर धरलेला उपवास रात्रि सोडावा.शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी-कुंक वाहुन नमस्कार करावा
- उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पुजा, आरती कहाणी- वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी-कुंकू देऊन एकेक फळ आणि या व्रतकथेची एकेक प्रत द्यावी. शक्य असल्यास एक सुवासिनीला जेवु घालावे.
व्रतकथेची पुस्तिका
व्रतकथेची पुस्तिका |
No comments:
Post a Comment