मकरसंक्रांती
- महाराष्ट्रात मकरसंक्रांती १४ किंवा १५ जानेवारीला म्हणजे सुर्य धुन राशितुन मकर राशि प्रवेश करतो,त्या दिवशी साजरी केली जाते.
- महाराष्ट्रात मकरसंक्रात हा तीन दिवसाचा सण आहे .
- पहिला दिवस "भोगी"- मकरसंक्रात हा सण हिवाळ्याच येतो, वातावरणात ब-यापैकी गारवा असतो. वातावरण पिकास पुरक असते. अशा वातावरणात सर्वञ मुबलक भाजीपाल उपलब्ध असतो .याच्यामुळेच कदाचित सर्वञ भोगीची भाजी उपलब्ध अनेक भाज्या एकञ करुन बनवितात .आमच्या घरात भोगीची भाजी माझी आई बनवायची. त्यात ती -
- 1. वांगे. २. वालाच्या हिरव्या शेंगा ३ गाजर. ४. डिंग-या . ५. बोर. ६ सोलाने ( हिरवा हरभरा). ७.ओले शेंगादाने निवडुन, सोलुन स्वच्छ करायची. व महाराष्ट्रायिन पद्धतिने कांदा, लसुन , खोबर, कोथिंबिर, व मकरसंक्रातील मुख्य पदार्थ "तिळ" घालुन काळी भाजी करत. त्याबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी .
- भोगीला गायीची पुजा करतात व गायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात.
- दुसरा दिवस मकरसंक्रांतीचा- या दिवशी सकाळी तीळ, हळद, दाळीच पीठ ,उटन, एकञ करुन पेस्ट बनवितात, ते लावुन स्नान करतात . नंतर सुवासिनी "सुगडे" पुजतात.
Makara sankranti
-
Sugde
- ञिक्रांती- या दिवशी ५ वर्षाखाली लहान मुलांना काळा ड्रेस घालतात, आसपासचे लहान मुलांना बोलतात. ५ सुवासिनी बाळाला औक्षन करतात, नंतर बोर व रेवड्या एकञ करुन ते हळुवारपणे बाळाच्या डोक्यावरुन टाकतात.याला" बोरन्हानबोरन्हान "म्हणतात. पुढे येणा-या उन्हान्याचा ञास कमी व्हावा,म्हणुन बाळच "बोरन्हान" करतात.सुगडे- खापराचे छोटी ५ बोळकी घेतात, त्यात ऊसाचे तुकडे, बिब्याचे फुल, गाजराचे तुकडे, हिरवा हरभरा, भुइमुगाच्या शेंगा, व तीळगुळ भरतात. ते देवघराजवळ मांडतात. नंतर त्यातील दोन सुगडे घेवुन सुवासिनी मंदिरात जातात. सुवासिनी या वेळेस पारंपरिक वेशभूषा करतात.मंदिरात त्या देवाला सुगडे वाहतात, पतीच्या दिर्घआयुची प्रार्थना करतात , इतर सुवासिनीनां हळदकुंकु लावुल छोटी भेटवस्तु देतात. तिळ गुळ वाटुन" तिळगुळ घ्या, गोड बोला."असे बोलण्याची पद्धति आहे.या दिवशी घरी पुरण पोळीचा स्वयंपाक करतात. संध्याकाळी छोटे मोठ्याकडे जावुन तिळगुळ घेतात. व आर्शिवाद घेतात.
Makara sankranti
Sugde
No comments:
Post a Comment