गुलाब फुल
हिंदी:- गुलाब फूल
इग्रंजी:- Rose
गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाबाचे झाड ३ते५ फुट उंचीचे काटेरी असते. गुलाबासाठी मध्यम तापमान लागते .
मोकळी हवा व सुर्यप्रकाशात त्याला बारामहिने फुले येतात.
- गुलाब विविध आकारात व रंगात आहेत.
- गुलाबाच्या फुलांचा उपयोग फुलांचे सजावटीत, लग्न समारंभ केला जातो.त्यासाठी मोठे व कमी वास असलेले फुल वापरतात.
- सुगंधी गुलाबापासुन अत्तर, गुलाबजल, गुलकंद तयार केला जातो
- .गुलाबाला देवपुजेत ही महत्वपूर्ण स्थान आहे
- .गुलाबाच्या सुदंरतेमुळे त्याची मनात हि जागा वेगळीच आहे. विविधप्रकारच्या केशरचने स्ञिया त्याचा वापर करतात.
- तसेच १२ फेब्रवारी गुलाब दिवस म्हणुन साजरा केला जातो. लाल रंगाचा गुलाब प्रेमाचा तर पिवळा गुलाब मैञीचा प्रतिक मानला जातो.
- सुगंधी गुलाबपासुन गुलकंद तयार करताना प्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करुन स्वच्छ बरणी भरावे, व वरुन साखर पेरतात.
- बरणीच झाकन पक्क लावुन , ती बरणी १० ते १५ दिवस उन्हात ठेवतात.
- गुलकंद थंड तत्वाचा असल्यामुळे उन्हाळ्यात खाने उत्तम मानले जाते.
- गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळुन गुलाबजल तयार करतात. त्याचा उपयोग सौर्दया प्रसादनात पुर्वीपासुन होत आला आहे.
- गुलाब त्याच्या सौर्दय व उपयोगामुळे फुलांचा राजा बनला आहे.
Rose flower
Rose flowers
Rose flowers
No comments:
Post a Comment