रूईचे फुल
रुई ही एक विषारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. हे एक झुुडुप आहे. रूईचे झाड हे सर्वत्र भारतात, नेपाळ, पाकिस्तानात आढळते. यात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या रंगाच्या फुलांची रूई व दुसरी पांढ-या फुलांची रूई. जांभळ्या फुलांची रूई सर्वत्र आढळते. पांढ-या फुलांची रूई क्वचितच सापडते. यातील पांढ-या फुलांच्या रूईच्या झाडाला 'मंदार' असेही म्हणतात. हिंदुशास्रात रूईला खुप महत्व आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्यया मंदार वॄक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे. तिची साल पिवळ पांढरी असुन खोडावर साधी, समोरासमोर, जाड, लहान देठांचखोडांना वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असता त्यांच्या देठांतून पांढरा चीक बाहेर पडतो. फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि त्यांच्या पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांत पाच पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. या झाड बद्दल अशी ही मान्यता आहे की, तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्र-मंत्र पासून सर्व प्रकारच्या काळ्या जादू पासून जादू टोण्या पासून करणी पासून सुरक्षित राहील.
आपल्या प्रगती वरती जळणारे अनेक लोक असतात आणि मग जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावरती झाली तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर अशा या काळ्या जादू पासून हे झाड आपले संरक्षण करतो खरं तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ भटकू सुद्धा न देणारं असं हे झाड आहे आणि म्हणून आपल्या घरात सकारात्मक शक्ती जर वाढीस लावायचे असेल तर आपली प्रगती करायची असेल तर हे झाड आपण नक्की लावा
पांढऱ्या रुईला मंदार, आक, अर्क आणि अकौआ असे देखील म्हणतात.
No comments:
Post a Comment