Thursday, January 17, 2019

झेंडु फुल

                            झेंडु फुल
                  
      हिंदी नाव : गेंदा
     इग्रजी : marigold

  •     या फुलांचे  रंग पिवळे ,लालसर-पिवळे, फिकट  पिवळे असतात. या झाडाची उंची फार वाढत नाही. ते रोप प्रकारात मोडते. त्याची पाने बारीक व लांबट आकाराची असतात. पानांचा रंग काळपट हिरवा असतो. झेंडुला उष्ण, कोरडे, व दमट हवमान लागते. झेंडुच्या फुलांत लहानलहान भरपूर पाकळ्या असतात. या झाडाला बी येत नाही.या पाकळ्या सुकल्या नंतर त्यापासुन रोप तयार करतात.
    झेंडु फूल, marigolds flower
    Marigolds flowers

    झेंडु फूल, marigolds flower
    झेंडु फूल

Tuesday, January 8, 2019

मकरसंक्रांती

           मकरसंक्रांती


  •        महाराष्ट्रात मकरसंक्रांती १४ किंवा १५ जानेवारीला म्हणजे सुर्य धुन राशितुन मकर राशि प्रवेश करतो,त्या दिवशी साजरी केली जाते.
  • महाराष्ट्रात मकरसंक्रात हा तीन दिवसाचा सण आहे .
  • पहिला दिवस "भोगी"- मकरसंक्रात हा सण हिवाळ्याच येतो, वातावरणात ब-यापैकी गारवा असतो. वातावरण पिकास पुरक असते.  अशा वातावरणात सर्वञ मुबलक भाजीपाल उपलब्ध असतो .याच्यामुळेच कदाचित सर्वञ भोगीची भाजी उपलब्ध अनेक भाज्या एकञ करुन बनवितात .आमच्या घरात भोगीची भाजी माझी आई बनवायची. त्यात ती -
  • 1. वांगे.  २. वालाच्या हिरव्या शेंगा  ३ गाजर. ४. डिंग-या . ५. बोर. ६ सोलाने ( हिरवा हरभरा). ७.ओले शेंगादाने निवडुन, सोलुन स्वच्छ करायची.  व महाराष्ट्रायिन पद्धतिने कांदा, लसुन , खोबर, कोथिंबिर, व मकरसंक्रातील मुख्य पदार्थ "तिळ" घालुन काळी भाजी करत. त्याबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी . 
  • भोगीला गायीची पुजा करतात व गायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात.
  • दुसरा दिवस मकरसंक्रांतीचा- या दिवशी सकाळी तीळ, हळद, दाळीच पीठ ,उटन, एकञ करुन पेस्ट बनवितात,  ते लावुन स्नान करतात . नंतर सुवासिनी "सुगडे" पुजतात.
  • Makara sankranti

    Makara sankranti
  • Sugde
  • ञिक्रांती- या दिवशी ५ वर्षाखाली लहान मुलांना काळा ड्रेस घालतात, आसपासचे लहान मुलांना बोलतात. ५ सुवासिनी बाळाला औक्षन करतात, नंतर बोर व रेवड्या एकञ करुन ते हळुवारपणे बाळाच्या डोक्यावरुन टाकतात.याला" बोरन्हानबोरन्हान "म्हणतात.  पुढे येणा-या उन्हान्याचा ञास कमी व्हावा,म्हणुन बाळच "बोरन्हान" करतात.सुगडे- खापराचे छोटी ५ बोळकी घेतात, त्यात ऊसाचे तुकडे, बिब्याचे फुल, गाजराचे तुकडे, हिरवा हरभरा, भुइमुगाच्या शेंगा, व तीळगुळ भरतात. ते देवघराजवळ मांडतात. नंतर त्यातील दोन सुगडे घेवुन सुवासिनी मंदिरात जातात. सुवासिनी या वेळेस पारंपरिक वेशभूषा करतात.मंदिरात त्या देवाला सुगडे वाहतात, पतीच्या दिर्घआयुची प्रार्थना करतात , इतर सुवासिनीनां हळदकुंकु लावुल छोटी भेटवस्तु देतात. तिळ गुळ वाटुन" तिळगुळ घ्या, गोड बोला."असे बोलण्याची पद्धति आहे.या दिवशी घरी पुरण पोळीचा स्वयंपाक करतात. संध्याकाळी  छोटे मोठ्याकडे जावुन तिळगुळ घेतात. व आर्शिवाद घेतात.

Monday, January 7, 2019

मकरसंक्रांती

           मकरसंक्राती     

  • भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मकरसंक्रांती साजरी केली जाते.
  • लोहडी- पंजाब, हरियाणामध्ये लोहडी नावाने मकरसंक्रांत एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राञी शेकोटी पेटवुन अग्निची पुजा करतात. व 
  • Lohri
    Lohri
  • पारंपरिक लोकगीत म्हणत नाचुन साजरी करतात .  खिचड़ीचा नैवैद्य करतात. त्यात प्रामुख्याने भुइमुगाच्या शेंगा, तिळ, गुळ, यांचा वापर करतात.
  • पोंगल- तामिळनाडु मधील मोठा सण
    Pongal, Makar sankranti
    Pongal
    असतो. त्यानिमित्याने शेतकरी सुर्यची पुजा करतात. हा सण तीन दिवस असतो, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात, त्यादिवशी इंद्राची पुजा करतात व गोड जीवन करतात. दुस-या दिवशी घराच्या अंगणात खीर (तांदुळ व दुध) करतात, तीचा नैवेद्य सुर्य व गणपतीला दाखवितात. तिस-या दिवशी गोपुजन करतात.
  • उत्तरायन - मकरसंक्रांत गुजरातमध्ये उत्तरायन नावने साजरी केली जाते.गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडविले जातात. उत्तरकडील वारे पतंग उडविण्याची मजा आधिकच वाढवितात. 
  • Kite, Makar sankranti
    Makar sankranti
  • दिवसभर आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते.तळलेले पदार्थ, गुळ, तिळ, खिचड़ी नैवेद्य सुर्याला दाखवितात.
  • मकरसंक्रांत- महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस "भोगी".  या दिवशी भोगीची भाजी व बाजरी भाकरी केली जाते.भोगी भाजीत वांगे, वाल, गाजर, सोलाने, तिळ घालुन भाजी बनवितात. गोपुजन करतात, गगायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात. संक्रांतिच्या दिवशी तिळ पोळी करतात. तिळ  व गुळ एकञ करुन रे लहान व्यक्ति देतात . ञिक्रांतीला ५ वर्षाखाली लहान मुलांना बोर व रेवडी वापरुन बोरन्हान करतात.
    Kumbh mela, Makar sankranti
    Makar sankranti
  • कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.

Sunday, January 6, 2019

मकरसंक्रांती

  1.                         

                   मकरसंक्रांती  

                         मकरसंक्राती हा सुर्याशी संबंधीत एक सण आहे .

Makar sankranti , pongal
Pongal
Makar sankranti, Pongal
Makar sankranti
  1. सुर्याचे धनु राशीतुन मकर राशी प्रवेश होतो. तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते.

       
  2.  हा एकच असा आहे कि, तो निच्छित तारखेला येतो. कारण हिंदु पंचांग हे चंद्रनुसार असतात. म्हणुन बाकी सर्व सण त्या तिथिनुसार येतात.
  3. हा एकच सण सुर्य तिथिवर साजरा केला जाते.
  4. सुर्यचे उत्तरायन हे २१-२२ डिसेंबरला सुरु होते . पण सुर्य मकर राशी प्रवेश १४-१५ जानेवारीला होते.                                                         
  5. हिंदू मान्यतेनुसार उत्तरायन हे शुभ मानले जाते.
  6. मकरसंक्रांत ही सण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावाने, पद्धतिने साजरा केला जातो.
  7. सुर्याचे मकर राशी प्रवेश होता तेव्हा वातावरण हि बदलते ,दिवस तिळतिळ मोठा होतो. ऱाञ छोटी होवु लागते.
  8. थंडी कमी व्हायला सुरवात होते. पण हवेत बर-यापैकी गारवा असतो. उत्तरकडील वारे वाहत असतात.
  9. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  10. मकरसंक्रात  वेगवेगळ्या नावने, वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जातो.
  11. मकरसंक्रांताची नाव-  तमिलनाडु- "पोंगल",बिहार, झारखंड- "संक्रांत", पंजाब,हरियाणा- "लोहरी", गुजरात- "उत्तरायन"असे इतर ठिकानी ही मकरसंक्रांत सादरी केली जाते

Friday, January 4, 2019

निशिगंध फुल

                             निशिगंध फुल


             हिंदी नाम - रजनीगंधा

       .  इग्रजी नाव - tube-rose

    निशिगंधालाच गुलछडी, असेही म्हणतात.   निशिगंधनिशिगंध हि वनस्पती १.५ ते २ मी.उचीची असते. त्याचे खोड हे कंद स्वरुपात जमिनी खाली असते.नविन रोप हे  कंदापासुनच होते.निशिगंधाची पाने लांब गवतासारखी असतात.या झाडाला फांद्या नसतात.कंदातुन एक सरळ दांडी येते व त्याला वरती कळ्या लागतात.निशिगंधाच्या फुलांच्या  देठे वाकडी असतात.या फुुलाच्या पाकळ्या छोट्या जाड असतात.या फुलांना छान सुगंध असतो.हि फुले सायंकाळी उमलु लागतात व राञीपर्यत उमलतात म्हणुन त्याला 'निशिगंध'म्हणतात. निशिगंधाच्या  तीन प्रकार पडतात.पांढरा निशिगंध, तांबडा निशिगंध, व्हेरीगेटेड निशिगंध असे प्रकार आहेत.पांढरा निशिगंधाची लागवड करताना जमिनीत कंद खोचतात. त्यातुन पाने व कोंब बाहेर येतो. काही दिवसानंतर त्यातुनच एक दांडा बाहेर येतो. तो दांडा १.५ ते २ फुट उंच झाला कि त्याच्या टोकाला कळ्याचा घोस लागतात.फुलांचा रंग पांढरा असतो.फुलांचा देठ वाकडा असतो.याला छान असतो.तांबडा निशिगंधाच्या फुलांच्या रंग तांबडा असतो. देठ सरळ असते. व्हेरीगेटेड निशिगंधचे 


Tube rose , nishigandha flower
निशिगंधा

Nishigandha, tuberose,
निशिगंधा

Thursday, January 3, 2019

मोगरा फुल

 

                              मोगरा फुल

                      हिंदी:- मोगरा

                      इग्रजी:- Jasmine


  •                   मोगरा हे सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे.  साधारण २ रे ३ से. मी. ञिज्या असलेले हे छोट फुल त्याच्या वासामुळे खुप आवडीचे आहे.
  •   मोगरा विविध प्रकारात असतो. त्यानुसार बट मोगरा, दुहेरी मोगरा, हजारी मोगरा व एकेरी मोगरा अशी मोग-याची नावे आहेत.
  • मोग-याची फुले सफेद रंगाची छोटी असतात.
  • त्याच्या पानांचा रंग गडद हिरवा, व आकाराने गोल असतात 
  • मोग-याला उन्हाळ्यात फले येतात. एकदा फुलांना सुरवात झाली की भरपूर फुले येतात.
  • बट मोग-याचे गेंदेदार छोटे असते. ते झुपक्याने येते. व वास खुप असतो. 
  • याच्या झाड झुपडाप्रमाने असते.
  • एकेरी मोग-याच्या फुलाला पाकळ्या एकेरी असतात. तो वेलाप्रमाने वाढतो.
  • याला वेली मोगरा हि म्हणतात.
  • केरी मोग-याला वास खुप असतो .
  • दुहेरी मोगर-याला दुहेरी पाकळ्या असतात.फुल थोडे मोठे असते. 
  •  हे झाड जमीनीवर किंवा कुंडीत हि वाढते
  • हजारी मोगरा तसा खुप वेगळा वाटतो.
  • त्याची पाने मोठी असतात. फुले गुच्छात, मोठी , कडेने तांबुस रंगाची व मधी सफेद रंगाची असतात.
  • वास कमी असतो.
  • सुगंधामुळे मोग-याचा उपयोग अत्तर, सुगंधी तेल, साबुन, अगरबत्ती, बनविण्यासाठी केला जातो.
  • तसेच या फुलांचे हार, गजरे करतात. देवपुजेत हि या फुलाला स्थान आहे.
  • Mogra f, Mogra flower
    Mogra
  • मोग-याचा उपयोग त्वाचेच्या आजारांवर हि करतात़.
  • Mogra ,Mogra flowers
    Mogra

    Mogra fl, Mogra flowers
    Mogra

    Mogra flow, Mogra flowers
    Add captionMograमोगरा

Tuesday, January 1, 2019

गुलाब फुल

                       

                              गुलाब फुल
                            
                  हिंदी:-    गुलाब फूल
                 इग्रंजी:-   Rose
      
                गलाब एक सुंदर , सुगंध असणारे फुल आहे.
 गुलाबाचे फुल विविध रंगाचे व आकारांचे आहे.
 गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाबाचे झाड ३ते५ फुट उंचीचे काटेरी असते. गुलाबासाठी मध्यम तापमान लागते .
मोकळी हवा व सुर्यप्रकाशात त्याला बारामहिने फुले येतात.
  • गुलाब विविध आकारात व रंगात आहेत.
  • गुलाबाच्या फुलांचा उपयोग फुलांचे सजावटीत, लग्न समारंभ केला जातो.त्यासाठी मोठे व कमी वास असलेले फुल वापरतात.
  • सुगंधी गुलाबापासुन अत्तर, गुलाबजल, गुलकंद तयार केला जातो
  • .गुलाबाला देवपुजेत ही महत्वपूर्ण स्थान आहे
  • .गुलाबाच्या सुदंरतेमुळे त्याची मनात हि जागा वेगळीच आहे. विविधप्रकारच्या केशरचने स्ञिया त्याचा वापर करतात.
  •  तसेच १२ फेब्रवारी गुलाब दिवस म्हणुन साजरा केला जातो. लाल रंगाचा गुलाब प्रेमाचा तर पिवळा गुलाब मैञीचा प्रतिक मानला जातो.
  • सुगंधी गुलाबपासुन गुलकंद तयार करताना प्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करुन स्वच्छ बरणी भरावे, व वरुन साखर पेरतात.
  • बरणीच झाकन पक्क लावुन , ती बरणी १० ते १५ दिवस उन्हात ठेवतात.
  • गुलकंद थंड तत्वाचा असल्यामुळे उन्हाळ्यात खाने उत्तम मानले जाते.
  • गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळुन गुलाबजल तयार करतात. त्याचा उपयोग सौर्दया प्रसादनात पुर्वीपासुन होत आला आहे.
  • गुलाब त्याच्या सौर्दय व उपयोगामुळे फुलांचा राजा बनला आहे.
    Rose information , flowers information in Marathi
    Rose flower

    Rose information , flowers information in Marathi
    Rose flowers

    Rose information , flowers information in Marathi
    Rose flowers

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...