Friday, October 20, 2023

सुगंध जीवनाचा-रे अजुन थोडे सोस मना

                  सुगंध जीवनाचा

   रोजच्या आयुष्यात येणा-या धावपळीतुन निवांत बसले कि मन शांत बसत नाही.  का?, कशासाठी?, का बर?, केव्हा पर्यंत?, असे अनेक प्रश्न मन निर्माण करते. मग ते रोजच्या धावपळीच्या बद्दल असो, कि जीवनातील अडचणी बद्दल असो, रोजच्या एकसारख्या रुटिंगला प्रॉब्लेमला, कंटाळायला होते. मग सर्व काही जाऊ दे, हे सर्व करुन तरी काय होणार, शेवटी काय उपयोगाला येणार. असे अनेक विचार मनात निर्माण होते.   "जीवन म्हणजे काय?" अगदी सर्वांना.    पडणार प्रश्न. कधी आनंद, कधी.              दुःखात, कधी एकांतात, कधी गोंधळात ...                 

आणि उत्तर ही तसेच.. प्रत्येक वेळी, प्रत्येक.    जणांना, कधी खुपच छान, कधी.   गोंधळेलेले, कधी एकांत, कधी सुंदर ...    

 जीवनावर भरभरून प्रेम करण्यासाठी जीवनातजीवनात सकारात्मक विचार केला पाहिजे, सुख व दु:ख दोन्ही हिस्सा आहे जीवनाचे. एक छान ओळ वाचली असेल,

मन म्हणाले

  "  मी सुख शोधत आहे, " 

दु:ख म्हणाले,   

    " मला बरोबर घेऊन चल, माझ्याशिवाय सुखाची जाणीव नाही होणार. " बरोबरच आहे ना. एक कविता वाचनात आली.  त्याचे कवी बा. भ. बोरकर आहेत.  समर्पक वाटली,  

 रे अजुन थोडे सोस मना

 जळल्यावाचून नाही ज्योती कढल्यावाचून  नाही मोती

 रडल्यावाचून ना प्रीती 

नच घणांवाचून देवपणा। प्रसववेदनांविण ना सृष्टि 

तपनावाचूनि नाही वृष्टी 

दुःखाविण ना जीवनदृष्टी 

मेल्याविण मिळाला स्वर्ग 

कुणा सुधेविना रसनेत ना गोडी छलनविना ना सुकृत जोडी

 उरी फुटल्या -विण सुटती ना कोड 

रस नसेल यातनेविण कवणा। 

दातांनी जरि जीभ चावली

 कोणी बत्तीशी सांग तोडली

 सगळी मी आपलीच मंडळी 

मग शब्द  कशाला उनादुना।

Happy



Friday, January 21, 2022

रूईचे फुलं

रूईचे फुल

 रुई ही एक विषारी आयुर्वेदिक  वनस्पती आहे. हे एक झुुडुप आहे.  रूईचे झाड हे सर्वत्र भारतात, नेपाळ, पाकिस्तानात आढळते. यात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या रंगाच्या फुलांची रूई व दुसरी    पांढ-या फुलांची रूई. जांभळ्या फुलांची रूई सर्वत्र आढळते.     पांढ-या फुलांची रूई क्वचितच सापडते.  यातील पांढ-या फुलांच्या रूईच्या झाडाला 'मंदार' असेही म्हणतात. हिंदुशास्रात रूईला खुप महत्व आहे.  १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्यया मंदार वॄक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे. तिची साल पिवळ पांढरी असुन  खोडावर साधी, समोरासमोर, जाड, लहान देठांचखोडांना वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असता त्यांच्या देठांतून पांढरा चीक बाहेर पडतो. फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि त्यांच्या पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांत पाच पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. या झाड बद्दल अशी ही मान्यता आहे की, तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्र-मंत्र पासून सर्व प्रकारच्या काळ्या जादू पासून जादू टोण्या पासून करणी पासून सुरक्षित राहील.

आपल्या प्रगती वरती जळणारे अनेक लोक असतात आणि मग जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावरती झाली तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर अशा या काळ्या जादू पासून हे झाड आपले संरक्षण करतो खरं तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ भटकू सुद्धा न देणारं असं हे झाड आहे आणि म्हणून आपल्या घरात सकारात्मक शक्ती जर वाढीस लावायचे असेल तर आपली प्रगती करायची असेल तर हे झाड आपण नक्की लावा

पांढऱ्या रुईला मंदार, आक, अर्क आणि अकौआ असे देखील म्हणतात.

Monday, January 10, 2022

वेगवेगळ्या राज्यात मकरसंक्रांतिचे नाव व माहिती

        

             मकरसंक्रांति  

  1. सुर्याचे धनु राशीतुन मकर राशी प्रवेश होतो. तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते.  हा एकच असा आहे कि, तो निच्छित तारखेला येतो. कारण हिंदु पंचांग हे चंद्रनुसार असतात. म्हणुन बाकी सर्व सण त्या तिथिनुसार येतात.
  2. हा एकच सण सुर्य तिथिवर साजरा केला जाते.
  3. सुर्यचे उत्तरायन हे २१-२२ डिसेंबरला सुरु होते . पण सुर्य मकर राशी प्रवेश १४-१५ जानेवारीला होते.                                                         
  4. हिंदू मान्यतेनुसार उत्तरायन हे शुभ मानले जाते.
  5. मकरसंक्रांत ही सण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावाने, पद्धतिने साजरा केला जातो.
  6. सुर्याचे मकर राशी प्रवेश होता तेव्हा वातावरण हि बदलते ,दिवस तिळतिळ मोठा होतो. ऱाञ छोटी होवु लागते.
  7. थंडी कमी व्हायला सुरवात होते. पण हवेत बर-यापैकी गारवा असतो. उत्तरकडील वारे वाहत असतात.
  8. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  9. वातावरणातल्या ह्या बदलाचा फायदा पतंग उडविण्यासाठी होतो. मकरसंक्रांत हा सण "पतंगाचा सण" म्हणुन हि ओळखतात.
  10. मकरसंक्रात वेगवेगळ्या नावने, वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जातो.

  1.   तामिळनाडू:-   पोंगल 
  2. आंध्र प्रदेश :-    संक्रांती 
  3. केरळ.   :-        संक्रांती 
  4. कर्नाटक   :-     संक्रांती 
  5. महाराष्ट्र.   :-    मकरसंक्रांति
  6. मध्य पदेश :-   सक्रांट / संकृत
  7. बिहार :-          संक्रांट / संकृत
  8. छत्तीसगड:-    संक्रांट / संकृत 
  9. झारखंड  :-     संक्रांट / संकृत 
  10. सिक्कीम :-    संक्रांट / संकृत 
  11. गुजरात:-      उत्तरायण 
  12. राजस्थान :-  उत्तरायण 
  13. उत्तरप्रदेश :-   खिचडी 
  14. पश्चिम बिहार:-  खिचडी 
  15. पश्चिम बंगाल:- खिचडी 
  16. हरियाणा. :-     मगही 
  17. हिमाचल प्रदेश:- मगही 
  18. पंजाब:-           लोहरी 
  19. आसाम:-       माघ बिहू
  20. काश्मीर :-    शिशूरसंक्रात
  21. त्रिपुरा:-   पौष संक्रांती 
  22. मेघालय:- 
  23. ओडेसा 
  24. अरुणाचल प्रदेश 
  25. नागालँड. :- साजरी केली जात नाही 
  26. उत्तराखंड :-  खिचडी/ संकृत  
  27. गोवा :-  साजरी केली जात नाही 
  28. तेलंगणा:- संक्रांती 
  •  लोहडी-   पंजाब, हरियाणामध्ये लोहडी नावाने मकरसंक्रांत एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राञी शेकोटी पेटवुन अग्निची पुजा करतात.
  •  पारंपारिक लोकगीते म्हणुन नाचून साजरी करतात. खिचडीचा नैवेद्य करतात. प्रामुख्याने भुईमूगाच्या शेंगा, तिळ, गुळ, यांचा वापर केला जातो. 
  •   पोंगल-  तामिळनाडु मधील मोठा सण असतो. त्यानिमित्याने शेतकरी सुर्यची पुजा करतात. हा सण तीन दिवस असतो, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात, त्यादिवशी इंद्राची पुजा करतात व गोड जीवन करतात. दुस-या दिवशी घराच्या अंगणात खीर (तांदुळ व दुध) करतात, तीचा नैवेद्य सुर्य व गणपतीला दाखवितात. तिस-या दिवशी गोपुजन करतात. 
  • उत्तरायन -   मकरसंक्रांत गुजरातमध्ये उत्तरायन नावने साजरी केली जाते.गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडविले जातात. उत्तरकडील वारे पतंग उडविण्याची मजा आधिक वाढवितात. दिवसभर आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते.तळलेले पदार्थ, गुळ, तिळ, खिचड़ी नैवेद्य सुर्याला दाखवितात.
  • मकरसंक्रांत- महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस "भोगी".  या दिवशी भोगीची भाजी व बाजरी भाकरी केली जाते.भोगी भाजीत वांगे, वाल, गाजर, सोलाने, तिळ घालुन भाजी बनवितात. गोपुजन करतात, गगायीला बाजरी व गुळ खाऊ घालतात. संक्रांतिच्या दिवशी तिळ पोळी करतात. तिळ  व गुळ एकञ करुन रे लहान व्यक्ति देतात . ञिक्रांतीला ५ वर्षाखाली लहान मुलांना बोर व रेवडी वापरुन बोरन्हान करतात
  • खिचडी- भारताच्या पूर्व भागात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा उत्सव खिचडी उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये बुडवून दिवसाची सुरूवात केली जाते. यावेळी अलाहाबाद माघ कुंभ सुरू होते. तीळ लाडू खाल्ले जातात व रात्रीच्या वेळी मिश्रित धान्यांची खिचडी बनविली जाते, जी देवाला अर्पित केल्यावर प्रसाद म्हणून घेतली जाते.
  • सक्रांट-  प्रदेशात सक्रात उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि सिक्कीममध्येही साजरा केला जातो. तीळ आणि गूळापासून बनवलेल्या मिठाई या सणाच्या गोडवा वाढवतात.
  • भोगाली बिहू/माघ बिहू-  भोगाली बिहू उत्सव भारताच्या ईशान्येकडील आसाममध्ये साजरा केला जातो. बिहू उत्सवात होलिका (लाकडाचा साठा) जाळला जातो. शेतकर्‍यांनी तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस पिके घेतल्यानंतर हा सणही साजरा केला जातो. 
  • कुंभ मेळा- बृहस्पति मेष राशीत, सूर्य व चंद्र मकर राशीत आल्यावर कुंभ स्नानाला सुरवात होते. तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. कुंभ मेळ्याच्या पहले स्नान याच दिवशी असते.

      

Monday, June 22, 2020

जुईचे फुलं

                जुई फुल

  • अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. जुई हे एक वेलीय झाड आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जस्मिनम ऑरिक्युलेटम (Jasminum auriculatum) असे आहे.हिला इग्रंजीत Needle Flower Jasmine   म्हणतात.     कुळ-  ओलिएसी 
  • जुईला संस्कृतमध्ये गणिका, अम्बष्ठा , मुग्धी,  यूथिका, सुचिमल्लिका अशी नावे आहेत. हिला इंग्रजीत Needle Flower Jasmine म्हणतात हिं. जुही, जुई; क. कदरमळ्ळिगे; . 
  • ही झुडपासारखी वेल मूळची उष्ण कटिबंधातील असून ती भारताच्या द्वीपकल्पात दक्षिणेकडे केरळापर्यंत आढळते. 
  • बागेतूनही तिची लागवड करतात. 
  • पाने बहुधा साधी, समोरासमोर, परंतु अनेकदा त्रिदली असून बाजूची दले फार लहान अथवा कर्णिकाकृती (कानाच्या पाळीसारखी). बेलाच्या पानाप्रमाणे तीन पाने एकत्र असल्याने तिला बेल जुई ही म्हटले जाते. 
  • फुलोरा संयुक्त, अनेक फुले असलेली विरळ वल्लरी [पुष्पबंध] व तीवर लहान पांढरी सुगंधी फुले असतात.
  • पुष्पमुकुट-नलिका १·२ सेंमी. लांब असून प्रत्येक पाकळीचा सुटा भाग दीर्घवर्तुळाकृती व ०.६ सेंमी. लांब असतो. 
  • एकूण संदले पाच व पाकळ्या पाच ते आठ व फूल समईसारखे (अपछत्राकृती); केसरदले दोन, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे [फूल]
  • वनस्पतीची लागवड सुगंधी फुलांसाठी भारतात सर्वत्र (विशेषत: उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल करतात; उ. प्रदेशात गाझीपूर, जौनपूर, फरुखाबाद आणि कनौज येथे व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. 
  • हिला निचऱ्याची व मध्यम प्रकारची जमीन लागते; हिवाळी हंगामात जमीन नांगरून, कुळवून व खत घालून वाफे तयार करतात व त्यांत नोव्हेंबर-जानेवारीच्या दरम्यान वेलाचे तुकडे तीन मी. अंतरावर लावतात. मोठया झुडपांजवळ जमिनीपासून नविन रोपही उगवतात.
  • पावसाळ्यात (जुलै-ऑगस्टच्या सुमारास ) फुले येण्यास सुरुवात होते. वेल वाढू लागले म्हणजे मांडवांवर चढवितात.
  • फुले हलकी असल्याने ती एका किग्रॅ.मध्ये २६,००० पर्यंत मावतात.
  • हेक्टरी सु. ९०–१८५ किग्रॅ. फुले मिळतात. ह्या सुगंधी फुलांतून ०·२० ते ०·३०% अत्तर निघते व ते गर्द तांबडे असते. 
  • फुलांपासून सुगंधी  तेलही तयार करतात. अत्तराला आणि तेलाला ताज्या फुलांच्या सुगंधासारखाच वास येतो;
  • तो जॅस्मिनच्या इतर जातींतील फुलांपेक्षा अधिक आल्हाददायक असतो. 
  • वेलावर कधीकधी काळ्या बुरशीचा (मेलिओला जॅस्मिनीकोला ) रोग पडतो. त्यावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण फवारतात.
  • जुईच्या फुलांचे चूर्ण, गुलकंद बनविले जाते. त्याचा उपयोग आम्लपित्त व पोटाचा अल्सरवर गुणकारी आहे. जुईमध्ये शितल तत्व आहे. तीचा उपयोग नेत्ररोग, पित्तनाशक, दंतरोग म्हणुन ही केला जातो. 

 

Monday, June 15, 2020

माझ्या मना बन दगड_मराठी कविता/ Marathi kavita


                            माझ्या मना बन दगड

          हा रस्ता अटळ आहे !

       अन्नाशिवाय, कपड्याशिवाय

       ज्ञानाशिवाय, मानाशिवाय

        कुडकुडणारे हे जीव पाहू नको, 

           डोळे शिव, नको पाहू जिणे भकास,

           ऐन रात्री होतील भास 

        छातीमधे अडेल श्वास,

          विसर यांना दाब कढ

        माझ्या मना बन दगड 

        हा रस्ता अटळ आहे !


           ऐकू नको हा आक्रोश

        तुझ्या गळ्याला पडेल शोष

        कानांवरती हात धरत्यांतूनही येतील स्वर

         म्हणून म्हणतो ओत शिसे

          संभाळ, संभाळ, लागेल पिसे!

           रडणाऱ्या रडशील किती?

              झुरणाऱ्या झुरशील किती?

           पिचणाऱ्या पिचशील किती?

           ऐकू नको असला टाहो

           माझ्या मना दगड हो!

           हा रस्ता अटळ आहे !


        येथेच असतात निशाचर

         जागोजाग रस्त्यावर

       असतात नाचत काळोखात;

         हसतात विचकून काळे दात

           आणि म्हणतात कर हिंमत

           आत्मा विक उचल किंमत!

         ससमाणूस मिथ्या, सोने सत्य

          स्मरा त्याला स्मरा नित्य!

       भिशील ऐकून असले वेद

          बन दगड नको खेद!


         बन दगड आजपासून

           काय अडेल तुझ्यावाचून

      गालावरचे खारे पाणी

         पिऊन काय जगेल कोणी?

         काय तुझे हे निःश्वास

         मरणाऱ्याला देतील श्वास?

        आणिक दुःख छातीफोडे

         देईल त्यांना सुख थोडे?

       आहे तेवढे दुःखच फार

      माझ्या मना कर विचारकर

         विचार हास रगड

     माझ्या मना बन दगड

      हा रस्ता अटळ आहे !


       अटळ आहे घाण सारी

       अटळ आहे ही शिसारी

         एक वेळ अशी येईल

       घाणीचेच खत होईल

       अन्यायाची सारी शिते

       उठतील पुन्हा, होतील भुतेया

        सोन्याचे बनतील सूळसुळी 

       जाईल सारे कूळ

       ऐका टापा! ऐका आवाज! 

         लाल धूळ उडते              

     आज त्याच्या मागून येईल

        स्वारया दगडावर लावील धार!

      इतके यश तुला रगड

        माझ्या मना बन दगड

Thursday, June 11, 2020

गोकर्ण फुलं

                      

                           गोकर्ण फुलं



     निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा      आकार आणि सुवास असणारी फुले                     आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले           लक्ष वेधून घेतो. असेच एक सुंदर, नाजूक   फूल म्हणजे गोकर्ण.

       गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय                  सदाहरित वनस्पती. Clitoria ternatea            (क्लायटोरिया टरनेशिया) हे गोकर्णाचे शास्त्रीय      नाव.

         फुलांचा आकार गायीच्या कानासारखा                   असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले          असावे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा            असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी,          सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील       आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या             पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.                     गोकर्णाच्या फुलांचा आकार गायीच्या                   कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी                      बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी              असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा          असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले        येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो. 

        फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा                    साधारण  फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या;            परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची            भाजी केली जाते.गोकर्णाच्या फुलांचे असंख्य           औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग,        व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला     जातो. 

     निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक                  रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले             सावलीत वाळवून त्याची पावडर करतात.           या  पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या          फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध           .किंवा गूळ घालून घेतात.

      गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते.          शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि        त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा                बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण             गोकर्णाची नवीन रोपे तयार करू शकतो.               पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत           या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत         करावी लागत नाही.घराची गॅलरी, कमान,            शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार..                अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची              लागवड करून तो परिसर सुशोभित करू                 शकता. गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल,           मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर          केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या               सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे.               तसेच त्वचा- विकार आणि                                     रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर        केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही        रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर            करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित         होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच           की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही               सुंदर नाव आहे.

Thursday, June 4, 2020

वटपौर्णिमा

                      वट पौर्णिमा 

         हिंदु पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी                पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणुन              साजरी केली जाते. ह्या दिवशी सुवासिनी              स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे वत्र करतात. 

           या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या          पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त          व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात        निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन      आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा      वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय            संस्कृतीने स्वीकारली असावी.

          एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला       की त्याची सहसा तोड होत नाही व्हावे म्हणून         वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेला           स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

       पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व                विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता            व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.सर्व             पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून           पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा         वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या        पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे,              धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच                   विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना               करतात

     पुजा साहित्य:--

       हळद-कुंकू, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट,      गंध-अक्षता, फुले, दूर्वा, उदबत्ती, कापूर,                 निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे,       सुपार्‍या,  आंबा फळ, 2 नारळ, गूळ, खोबरे,        बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही,          तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम, 

               सौभाग्यवायनाचे साहित्य-

     तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा,            फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या ,         सुटे पैसे..इ. 
वटपौर्णिमा,पुजा, साहित्य
पुजेचं ताट

      पुजा विधी:--- 

      कुठल्याही वत्राच्या विधीला सुरवात                      करण्याआधी घरातील जेष्ठांचे आशिर्वाद             घेऊन  पुजेला  सुरुवात करावी. या दिवशी               सौभाग्यवतीने   स्त्रीने नवे वस्त्र परिधान                करावे, सौभाग्याचे लेने घालावे. स्त्रियांनी या          दिवशी उपवास करावा. नंतर घरातील देवांची          पूजा करून देवापुढे संकल्प करावा.                      सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला        आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प         करावा. नंतर वडाच्या झाडाची पूजा                   करण्यासाठी जावे. प्रथम वडाच्या झाडाला

    पाणी फिरवावे. पुर्व दिशेला तोंड करून बसावे.     विड्याच्या पानांवर गणपती बाप्पाचे प्रतिक           म्हणून सुपारी मांडावीत.गणपतीची हळद कुंकू         अक्षता वाहून पंचोपचार पूजानंतर सती                मातेच्या  सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.       हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे         सौभाग्य अलंकार अर्पण करावे.वडाचे                   मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह                       षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती       करावी.वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध      साखरेचा नैवेद्य दाखवावा.वडाच्या झाडाला           तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा                    घालाव्या.  हे मंत्र म्हणावे- 

” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”

5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.  सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...