Wednesday, May 27, 2020

विश्वास ठेवा यात काही पापं-मराठी कविता/ marathi kavita

  •        

       विश्वास ठेवा यात काही पापं नाही


Marathi poems


                    सिगरेटचा जेव्हा तुम्ही, 

                       मजेत घेता मस्त झुरका, 

                        आवडलेल्या आमटीचा, 

                  आवाज करीत मारता मुरका 

           विश्वास ठेवा यात काही पापं  नाही,  


                 आनंदाने जगायचं नाकारणं,

        याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही  


                   जबरदस्त डुलकी येते, 

                 धर्मग्रंथ वाचता वाचता 

                लहान बाळासारखे तुम्ही,

                 खुर्चीतच पेंगुळलेला लागता,

            विश्वास ठेवा यात काही पापं नाही,

            आनंदाने जगायचं नकारणं, 

       याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!


             देवळापुढील रांग टाळून, 

                 तुम्ही वेगळी वाट करता, 

                    कांदाभजी खाऊन, 

                 पोटोबाची पूजा करता, 

         विश्वास ठेवा यात काही पापं नाही,

            आनंदाने जगायचं नकारणं,   

         याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!


                   प्रेमाची हाक येते, 

                 तुम्ही धुंद साद देता,

                कवितेच्या ओळी ऐकून,

                मनापासून दाद देता,

         विश्वास ठेवा यात काही पापं नाही,

             आनंदाने जगायचं नकारणं, 

        याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!    


                  मंगेश पाडगावकर 

Thursday, May 21, 2020

सांगा कसं जगायचं?- मराठी कविता / Marathi_kavita

             "सांगा कसं जगायचं"?
"सांगा कसं जगायचं "? ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखनातून अवतरलेली एक सुंदर अशी कविता! आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी असुन सुद्धा केवळ त्याकडे दुर्लक्ष केले जाते, व नकारात्मक गोष्टीकेडे लक्ष्य केंद्रित करून मनुष्य दुःखी होत राहतो, विचारातील नकारात्मकता सोडुन देऊन सकारात्मक विचार केला पाहिजे हे विचार कविवर्य मंगेश पाडगावकर अगदी सहज शब्दात तुम्हालाच ठरवायला सांगितले आहे.


                          सांगा कसं जगायचं ?
           कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा !
      डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना?
         ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच  ना?
               शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
                तुम्हीच ठरवा!
                   सांगा कसं जगायचं?...

          काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं
             तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभ असतं
                 कोळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
                  तुम्हीच ठरवा!
                  सांगा कसं जगायचं?...

        पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं,
          आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं?
         काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
           तुम्हीच ठरवा!
                 सांगा कसं जगायचं?...

        पेला अर्धा सरला आहे असं सुध्दा म्हणता येतं
         पेला अर्धा भरला आहे असं सुध्दा म्हणता येत
           सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
           तुम्हीच ठरवा!

                सांगा कसं जगायचं?
           कण्हत कण्हत की गाणं म्हणत
              तुम्हीच ठरवा!

                     
                                      मंगेश पाडगावकर


Sunday, May 17, 2020

मराठी कविता_कणा/ Kavita

 विष्णु वामन शिडवाडकर हे मराठी भाषेतील अग्रेगण्य कवी,लेखक, नाटककार, कथाकार  होते, त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले.कुसुमाग्रजांची निवडक कविता ती म्हणजे  त्याची 'कणा ' ही कविता नेहमीच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे:------

 
पुर, कणा
 कणा 
             

                    कणा 

  " ओळखलतं का सर मला

                 पावसात आला कोणी 

 कपडे होते कर्दमलेले

             केसावरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला,

              बोलला वरती पाहुन; 

'गंगामाई पाहुणी आली,

             गेली घरट्यात राहून,

 माहेरवाशीण पोरीसारखी 

              चार भिंतीत नाचली

 मोकळ्या हाती जाईल 

          कशी बायको मात्र वाचली

 भिंत खचली, चुल विझली,

                 होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यामध्ये

               पाणी थोडे ठेवले 

 कारभारणीला घेऊन संगे सर, 

आता लढतो आहे

            पडकी भिंत बांधतो आहे. 

         चिखलगाळ काढतो आहे,

   खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला 

       'पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला 

         मोडून पडला संसार तरी मोडला नाही

                         'कणा'

      पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा.'

कणा, मराठी कविता, कुसुमाग्रज
कुसुमाग्रज 

                                                             कुसुमाग्रज 

         

                    


Monday, December 16, 2019

चंपाषष्टी व भरीत रोडगा नैवद्य

              चंपाषष्टी व भरीत रोडगा नैवद्य
जेजुरीचा खंडोबा व तुळजापूरची जगदंबा ही महाराष्टातील जन मानसातील मानाची ठिकाणे आहेत.लोकांचे कार्य ह्या दोन दैवतांच्या पुजनाने व दर्शना शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, अशी श्राद्धा आहे. श्री शंकराने मणि व मल्ल दैत्यांचा वध करण्यासाठी  श्री मार्तंड भैरव खंडोबा देवाचा कृतयुगा अवतार धारण केला

मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्टी या सहा दिवस श्री खंडोबा देवाचे घट बसवितात .त्यास खंडोबाचे षडरात्र उत्सव म्हणतात. घट बसल्यावर मल्हारी महात्म मार्तंड विजय, मल्हारी सहस्रनाम अशा ग्रंथांचे देवा पुढे वाचन करतात.रोज घटाला फुलांची माळ घालतात. जेजुरीत हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. चंपाषष्टी या दिवशी मार्तंड भैरवांने मल्लसुरांचा वध केला तेव्हा देवांनी व गणांनी  देवाची पुजा चाफ्याच्या फुलांनी केली यामुळे षष्टीच्या या दिवसाला चंपाषष्टी असे म्हणतात. चंपाषष्टीच्या दिवशी मोठी याञा भरते. या दिवशी भरीत रोडगा, पुरण पोळी यांचा नैवद्य करतात. 

चंपाषष्टीला वांग्याचे भरीत व बाजरीचे रोडगे छोटी भाकरी बनविण्याची प्रथा आहे. छोटे छोटे सात रोडगे बनवुन त्यावर भरीत ठेवतात, व तळी भरतात. पाच नैवद्य तळी भरणा-याना देतात. व एक कुत्राला खाऊ घालतात. एक गाईला देतात.
चंपाषष्टी,तळी,भरती रोडगा
डिवटी

खंडोबा भंडारा

तळी भरणे


भरीत रोडगे नैवद्य

Wednesday, November 27, 2019

मार्गशीर्ष महिना व त्यातील महालक्ष्मी व्रत


  • मराठी महीन्यातील नऊ नंबर येणारा महीना मार्गशीर्ष . हा महीना भगवान विष्णु लक्ष्मी समर्पित आहे.
  • ह्या महीन्यात तसेतर विशेष सन नाहीत, पण उत्पन्ना एकादशी, मार्गशीर्ष अमावस्या, विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, दत्त जंयती अशा प्रमुख तिथि येतात.
  • त्यातच मार्गशीर्ष महीन्यात येणारे सर्व गुरूवार महालक्ष्मीचे व्रत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने घरातील मुली व सुहासनी करतात.

  • हे व्रत का करतात -------

  • श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला सदैव लाभावी. आपला संसार सुखसमाधाने चालावा. सुख , शांति , ऐश्वर्य मिळविण्यासाठी हे व्रत करतात.
  • हे व्रत करण्याची विधी ----
  • व्रताची सुरूवात मार्गशीर्ष माहीन्यातील पहिल्या गुरूवार सुरू क रावी. व शेवटच्या गुरूवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष महीन्यातील शेवटच्या गुरूवार नाही जमले, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरूवारपासून व्रत सुरू करावे.

  • पुजेची मांडणी--------

  • घरातील पुजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे पिवळ्या रंगाचे कापड टाकावे. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मीचा फोटो जो आपल्या घरीतील रोज च्या पुजेचा तो मांडावा. फोटोसमोर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशावर कुंकवाच्या गंधाने स्वास्तीक काढावे, पाच कुंकवाचे व चार हळदीचे बोट उमठावे. कलशात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कलशावर विड्याची पाच पाने ठेवुन नारळ ठेवावे.घटाच्या उजव्या बाजुला दोन विड्याची पाने एकावर ठेवुन त्यावर एक सुपारी गणपतिचे प्रतीक म्हनुन मांडावे , समोर पीड़ा, खारीक, खोबर, बदाम, गुळ , लंवग, हिरवी विलायची, ठेवावी नैवद्याला पिवळ्या रंगाची फळे ठेवावी. पुजा मांडुन झाल्यावर पिवळ्या रंगाची फुले वाहावीत.आरती करावी, सर्वाना प्रसाद द्यावा. सायंकाळी कथा वाचावी. रात्रि श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवद्य दाखवावा. दिवसभर धरलेला उपवास रात्रि सोडावा.शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी-कुंक वाहुन नमस्कार करावा

  •   उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पुजा, आरती कहाणी- वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी-कुंकू देऊन एकेक फळ आणि या व्रतकथेची एकेक प्रत द्यावी. शक्य असल्यास एक सुवासिनीला जेवु घालावे.
    मार्गशीर्ष, श्री, लक्ष्मी, व्रत,
    व्रतकथेची पुस्तिका 

  • ह्या व्रताच्या कथेत लक्ष्मी मातेचा हा संदेश दिला गेला आहे की, 
  • उतु नाही, मातु नाही , दिला शब्द तोडु नाही
  • श्रीमतीवर गर्व करु नये, दैवी कृपा कशी फिरेन सांगता येत नाही, नेहमी आपल्यात नम्रता , बोलण्यात प्रेमळपणा राहु देवा.

Thursday, November 14, 2019

नवरात्रि/घटस्थापना

               नवरात्रि/ घटस्थापना

  • अश्विनी महीन्या सुरु होणा-या या नवरात्रिला शारदीय नवरात्रिही म्हणतात.
  • नवरात्रित विशेष करून देवीची उपासना केली जाते
  • .अश्विनी शुध्द प्रतिपदा ते नवमी, असा हा नऊ दिवसाच्या कालावधीत घरोघरी घट स्थापना केली जाते. 
  • घटामध्ये देवीची स्थापना करुन, नंदादीप प्रज्वलित करुन अदिमायेची नऊ दिवस मनोभावे पुजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
  •  या दिवशी देवघरातील सर्व देव मूर्ति व टाक हे साबण लिंबु लावुन स्वच्छ करतात . देवघर  स्वच्छ धुवून काढतात. काही ठिकाणी देवघराला गेरू व चुऩ्याने रंगवतात
  • त्यानंतर देवीचा टाक सोडुन सर्व देव देवघरात नेहमी प्रमाणे ठेवतात. 
  • एका स्वतंत्र पाट किंवा चौरंगावर देवीचा फोटो  मांडतात. देवी टाक विड्याच्या पानावर ठेवुन फोटो समोर किंवा थोड एका बाजु मांडवा.
  •  आत घटाची तयारी करावी . परंपरेनुसार देवाच ताट, पत्रवाळी , मातीच भांड, किंवा काड्याची टोपली जात घट बसवितात ते भांड देवीच्या टाका समोर ठेवावे.
  • त्यात सुकलेली काळी माती/ शेतातील माती  भरावी.  
  • त्यात सप्तधान्याच्या बिया, म्हणजे गहु, तिळ जवस, करडई, हरभरा,धने,साळ उगविण्यासाठी टाकाव्यात.
  • मधोमध घट मांडावा, त्यात पाच विड्याचे पाच विड्याचे पान ठेवावे.परंपरेनुसार वर नारळ ठेवावे.
  • मला फार माहीत नाही पण माझ्या सासरी घटावर नारळ ठेवत नाही, असे मला माझ्या सासूबाईनी सांगितले. माहेरी आई घटावर नारळ ठेवते.
  •   हिंदु मान्यता नुसार कुठली पुजा गणपति शिवाय पूर्ण होवु शकत नाही, म्हणुन विड्याच्या पानवर प्रतिकांत्मक सुपारी मांडुन त्यापुढे विडा/ खारीक, खोबर, कन्या बदाम, विलायची, लवंग, गुळ ठेवावे. 

  •  घटाच्या उजव्या बाजुला अखंड नंदादिप, जो नऊ दिवस विजणार नाही, प्रज्वलित करावा.
  • पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घटावर सोडावी.
  • संकल्प सोडावा, व गणपती, देवी, व नवरात्रीची आरती करावी. 
  • नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठन करतात, रोज वेगवेगळ्या पानाची माळ घटात सोडतात.
  • नवमीला शेवंती, दशमीला झेंडु च्या फुलांची माळ  घटवर सोडावी.
    नवरात्रि, घटस्थापना
    घटस्थापना


    दशमीला घटातील धन


Sunday, January 27, 2019

जाई फूल

         जाई फूल

    हिंदी नाव- जाई
  इंग्रजी नाव- Jasmine
  • जाई फुले सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे.
  • जाईचे फुल अगदी नाजुक असते.
  • या फुलाला पाच पाकळ्या असतात.
  • जाईची कळीला लाल गुलाबी पट्टा असतो.
  • जाईचा वेल असतो.
  • जाईचा वेल लावताना प्रथम गोल खड्डा करुन त्यात जाईच्या फांदीचे कडे करुन ,ते मातीत पुरले जाते.
  • काही दिवसानंतर त्यातुन कोंब येतात व वेल वाढु लागतात
  • जाईचे पाने संयुक्त पद्धतिचे असतात.
  • एका पर्णिकाला पाच छोटे पाने असतात.
  • याच्या फांद्या नाजुक असतात, त्यांना आधाराची गरज असते, त्यासाठी मांडव करावा लागतो.
  • हे फुल सुगंधी आहे. त्यापासुन सुगंधी द्रव्य बनवितात.
  • जाईच्या अगरबत्ती,अत्तराला बाजारात चांगली मागणी आहे.
  • केसांच्या वाढीसाठी जाईच्या फुलांपासुन तेल केले जाते.
  • जाई पाने दात दुखीवर उपाय म्हणुन वापरतात.
  • अलीकडे जाईच्या फुलांची वाढती मागणीमुळे याची लागवड व्यापारी पद्धतिने होत आहे
    जाई फुल,Jasmine flowers
    Jasmine flowers

    जाई फुल
    जाई फुलाची कळी



    जाई फुल
    जाईचे पाने

एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...