Hello guys my blog is about : Basic information about flowers , festivals and diets in Marathi, marathi poems
Monday, June 22, 2020
जुईचे फुलं
Monday, June 15, 2020
माझ्या मना बन दगड_मराठी कविता/ Marathi kavita
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव पाहू नको,
डोळे शिव, नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धरत्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
ससमाणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचारकर
विचार हास रगड
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुतेया
सोन्याचे बनतील सूळसुळी
जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते
आज त्याच्या मागून येईल
स्वारया दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
Thursday, June 11, 2020
गोकर्ण फुलं
गोकर्ण फुलं
निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा आकार आणि सुवास असणारी फुले आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले लक्ष वेधून घेतो. असेच एक सुंदर, नाजूक फूल म्हणजे गोकर्ण.
गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती. Clitoria ternatea (क्लायटोरिया टरनेशिया) हे गोकर्णाचे शास्त्रीय नाव.
फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले असावे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात. गोकर्णाच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो.
फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या; परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते.गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो.
निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध .किंवा गूळ घालून घेतात.
गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण गोकर्णाची नवीन रोपे तयार करू शकतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही.घराची गॅलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार.. अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करू शकता. गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा- विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे.
Thursday, June 4, 2020
वटपौर्णिमा
वट पौर्णिमा
हिंदु पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणुन साजरी केली जाते. ह्या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे वत्र करतात.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.
एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात
पुजा साहित्य:--
हळद-कुंकू, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध-अक्षता, फुले, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, सुपार्या, आंबा फळ, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम,
सौभाग्यवायनाचे साहित्य-
तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या , सुटे पैसे..इ.
पुजेचं ताट |
पुजा विधी:---
कुठल्याही वत्राच्या विधीला सुरवात करण्याआधी घरातील जेष्ठांचे आशिर्वाद घेऊन पुजेला सुरुवात करावी. या दिवशी सौभाग्यवतीने स्त्रीने नवे वस्त्र परिधान करावे, सौभाग्याचे लेने घालावे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. नंतर घरातील देवांची पूजा करून देवापुढे संकल्प करावा. सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. नंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जावे. प्रथम वडाच्या झाडाला
पाणी फिरवावे. पुर्व दिशेला तोंड करून बसावे. विड्याच्या पानांवर गणपती बाप्पाचे प्रतिक म्हणून सुपारी मांडावीत.गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजानंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
Wednesday, June 3, 2020
प्रेम म्हणजे प्रेम असतं _मराठी कविता/ Marathi kavita
प्रेम म्हणजे प्रेम असतं
... अगदी 'सेम' असतं !
काय म्हणता?
या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
आहो,असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे!
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं,
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !
मराठीतून इश्श्य म्हणुन
प्रेम करता येतं,
उर्दुमध्ये इश्क म्हणुन
प्रेम करता येतं,
व्याकरणात चुकलात
तरी प्रेम करता येतं,
कॉन्व्हेट शिकलात
तरी प्रेम करता येतं!
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लागतात!
आठवतं ना?
तुमची आमची सोळावी
जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती!
लाटांवर बेभान होऊन
नाचली होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो!
बुडालो असतो तरी चाललं असतं
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं!
तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुध्दा कळलं होतं!
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!
प्रेमही झुठ असतं
म्हणणारी माणसं भेटतात
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात!
असाच एक जण
चक्क मला म्हणाला
"आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही! "
पाच मुल झाली तरी
प्रेमही कधीसुध्दा केल नाही!
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?
त्याला वाटलं मला पटलं!
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र 'सेम ' नसतं!
तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने!
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने!
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत,
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिराला असाल!
प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुध्दा!!
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्दा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!!
मंगेश पाडगावकर
Friday, May 29, 2020
विझलो जरी मी आज _मराठी कविता /Marathi_kavita
विझलो जरी मी आज
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते.
विझलो जरी मी आज
हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेल मी
अडवू शकेल मला
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे
केलेत कैक कावे ..
जळेल झोपडी अशी
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी
वादळे होती आतूर..
डोळ्यात जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
सुरेश भट
Wednesday, May 27, 2020
विश्वास ठेवा यात काही पापं-मराठी कविता/ marathi kavita
विश्वास ठेवा यात काही पापं नाही
सिगरेटचा जेव्हा तुम्ही,
मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा,
आवाज करीत मारता मुरका
विश्वास ठेवा यात काही पापं नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं,
याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही
जबरदस्त डुलकी येते,
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही,
खुर्चीतच पेंगुळलेला लागता,
विश्वास ठेवा यात काही पापं नाही,
आनंदाने जगायचं नकारणं,
याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!
देवळापुढील रांग टाळून,
तुम्ही वेगळी वाट करता,
कांदाभजी खाऊन,
पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पापं नाही,
आनंदाने जगायचं नकारणं,
याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!
प्रेमाची हाक येते,
तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून,
मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पापं नाही,
आनंदाने जगायचं नकारणं,
याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!
मंगेश पाडगावकर
Thursday, May 21, 2020
सांगा कसं जगायचं?- मराठी कविता / Marathi_kavita
"सांगा कसं जगायचं"?
"सांगा कसं जगायचं "? ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखनातून अवतरलेली एक सुंदर अशी कविता! आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी असुन सुद्धा केवळ त्याकडे दुर्लक्ष केले जाते, व नकारात्मक गोष्टीकेडे लक्ष्य केंद्रित करून मनुष्य दुःखी होत राहतो, विचारातील नकारात्मकता सोडुन देऊन सकारात्मक विचार केला पाहिजे हे विचार कविवर्य मंगेश पाडगावकर अगदी सहज शब्दात तुम्हालाच ठरवायला सांगितले आहे.
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा !
डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभ असतं
कोळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
पेला अर्धा सरला आहे असं सुध्दा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे असं सुध्दा म्हणता येत
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
मंगेश पाडगावकर
"सांगा कसं जगायचं "? ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखनातून अवतरलेली एक सुंदर अशी कविता! आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी असुन सुद्धा केवळ त्याकडे दुर्लक्ष केले जाते, व नकारात्मक गोष्टीकेडे लक्ष्य केंद्रित करून मनुष्य दुःखी होत राहतो, विचारातील नकारात्मकता सोडुन देऊन सकारात्मक विचार केला पाहिजे हे विचार कविवर्य मंगेश पाडगावकर अगदी सहज शब्दात तुम्हालाच ठरवायला सांगितले आहे.
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा !
डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभ असतं
कोळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?...
पेला अर्धा सरला आहे असं सुध्दा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे असं सुध्दा म्हणता येत
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
मंगेश पाडगावकर
Sunday, May 17, 2020
मराठी कविता_कणा/ Kavita
विष्णु वामन शिडवाडकर हे मराठी भाषेतील अग्रेगण्य कवी,लेखक, नाटककार, कथाकार होते, त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले.कुसुमाग्रजांची निवडक कविता ती म्हणजे त्याची 'कणा ' ही कविता नेहमीच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे:------
कणा |
कणा
" ओळखलतं का सर मला "
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले
केसावरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला,
बोलला वरती पाहुन;
'गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल
कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चुल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यामध्ये
पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर,
आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.
चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही
'कणा'
पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा.'
कुसुमाग्रज |
कुसुमाग्रज
Subscribe to:
Posts (Atom)
एकांत माझा
एकांत माझा हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा. नको...
-
विझलो जरी मी आज सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार र...
-
"सांगा कसं जगायचं"? "सांगा कसं जगायचं "? ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखनातून अवतरलेली एक सुंदर अशी क...
-
जाई फूल हिंदी नाव- जाई इंग्रजी नाव- Jasmine जाई फुले सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे. जाईचे फुल अगदी नाजुक असते. या फुला...