वट पौर्णिमा
हिंदु पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणुन साजरी केली जाते. ह्या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे वत्र करतात.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.
एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात
पुजा साहित्य:--
हळद-कुंकू, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध-अक्षता, फुले, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, सुपार्या, आंबा फळ, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम,
सौभाग्यवायनाचे साहित्य-
तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या , सुटे पैसे..इ.
पुजेचं ताट |
पुजा विधी:---
कुठल्याही वत्राच्या विधीला सुरवात करण्याआधी घरातील जेष्ठांचे आशिर्वाद घेऊन पुजेला सुरुवात करावी. या दिवशी सौभाग्यवतीने स्त्रीने नवे वस्त्र परिधान करावे, सौभाग्याचे लेने घालावे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. नंतर घरातील देवांची पूजा करून देवापुढे संकल्प करावा. सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. नंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जावे. प्रथम वडाच्या झाडाला
पाणी फिरवावे. पुर्व दिशेला तोंड करून बसावे. विड्याच्या पानांवर गणपती बाप्पाचे प्रतिक म्हणून सुपारी मांडावीत.गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजानंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”