Friday, October 20, 2023

सुगंध जीवनाचा-रे अजुन थोडे सोस मना

                  सुगंध जीवनाचा

   रोजच्या आयुष्यात येणा-या धावपळीतुन निवांत बसले कि मन शांत बसत नाही.  का?, कशासाठी?, का बर?, केव्हा पर्यंत?, असे अनेक प्रश्न मन निर्माण करते. मग ते रोजच्या धावपळीच्या बद्दल असो, कि जीवनातील अडचणी बद्दल असो, रोजच्या एकसारख्या रुटिंगला प्रॉब्लेमला, कंटाळायला होते. मग सर्व काही जाऊ दे, हे सर्व करुन तरी काय होणार, शेवटी काय उपयोगाला येणार. असे अनेक विचार मनात निर्माण होते.   "जीवन म्हणजे काय?" अगदी सर्वांना.    पडणार प्रश्न. कधी आनंद, कधी.              दुःखात, कधी एकांतात, कधी गोंधळात ...                 

आणि उत्तर ही तसेच.. प्रत्येक वेळी, प्रत्येक.    जणांना, कधी खुपच छान, कधी.   गोंधळेलेले, कधी एकांत, कधी सुंदर ...    

 जीवनावर भरभरून प्रेम करण्यासाठी जीवनातजीवनात सकारात्मक विचार केला पाहिजे, सुख व दु:ख दोन्ही हिस्सा आहे जीवनाचे. एक छान ओळ वाचली असेल,

मन म्हणाले

  "  मी सुख शोधत आहे, " 

दु:ख म्हणाले,   

    " मला बरोबर घेऊन चल, माझ्याशिवाय सुखाची जाणीव नाही होणार. " बरोबरच आहे ना. एक कविता वाचनात आली.  त्याचे कवी बा. भ. बोरकर आहेत.  समर्पक वाटली,  

 रे अजुन थोडे सोस मना

 जळल्यावाचून नाही ज्योती कढल्यावाचून  नाही मोती

 रडल्यावाचून ना प्रीती 

नच घणांवाचून देवपणा। प्रसववेदनांविण ना सृष्टि 

तपनावाचूनि नाही वृष्टी 

दुःखाविण ना जीवनदृष्टी 

मेल्याविण मिळाला स्वर्ग 

कुणा सुधेविना रसनेत ना गोडी छलनविना ना सुकृत जोडी

 उरी फुटल्या -विण सुटती ना कोड 

रस नसेल यातनेविण कवणा। 

दातांनी जरि जीभ चावली

 कोणी बत्तीशी सांग तोडली

 सगळी मी आपलीच मंडळी 

मग शब्द  कशाला उनादुना।

Happy



एकांत माझा

                                                  एकांत माझा     हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.   नको...